Shravan Month 2025: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? ही 5 कारणे तुम्हाला माहितीये का?
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
श्रावण महिन्यात अनेक पथ्ये पाळली जातात. केस आणि नखे कापत नाहीत. मद्यपान टाळले जाते, सर्वात महत्वाचं म्हणजे बहुतांश लोक मांसाहार करीत नाही. यामागे धार्मिक कारण तर आहेच. पण, त्याचबरोबर वैज्ञानिक कारण देखील आहे.
अमरावती: 25 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यामध्ये भगवान शंकराची पूजा केली जाते. त्यामुळे श्रावण महिना धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात अनेक पथ्ये पाळली जातात. केस आणि नखे कापत नाहीत. मद्यपान टाळले जाते, सर्वात महत्त्वाचं म्हणजे बहुतांश लोक मांसाहार करीत नाहीत. यामागे धार्मिक कारण तर आहेच. पण, त्याचबरोबर वैज्ञानिक कारण देखील आहे. श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? याविषयी डॉक्टरांनी माहिती दिली आहे. श्रावण महिन्यात वातावरणात अनेक बदल घडून येतात. त्यामुळं आपल्या जीवनशैलीमध्ये काही बदल करावे लागतात, असे डॉ. सारंग बहुरूपी सांगतात.
श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये?
यामागचे वैज्ञानिक कारण सांगताना डॉ. सारंग बहुरूपी सांगतात की, श्रावण महिना म्हणजेच या काळात पावसाळा सुरू असतो. त्यामुळे वातावरणात आर्द्रता खूप वाढलेली असते. त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होतो आणि पाचक अग्नी मंदावतो. त्यामुळे पचनक्रिया सुद्धा मंदावते. नॉनव्हेज जड असल्याने पचायला वेळ लागतो, त्यामुळे अपचन, ॲसिडिटी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.
advertisement
संसर्गजन्य रोगांचा धोका
त्याचबरोबर पावसाळ्यात संसर्गजन्य रोगांचा धोका सुद्धा अधिक असतो. बॅक्टेरिया, व्हायरस, फंगस यांचे प्रमाण वाढल्याने मासे, मटण, अंडी अशा पदार्थांमध्ये फूड पॉयझनिंग किंवा फंगल इन्फेक्शनचा धोका अधिक असतो. त्यामुळे या काळात नॉनव्हेज टाळणे फायद्याचे ठरते, असं ते सांगतात.
advertisement
पुढे ते सांगतात की, एका विशिष्ट वेळेनंतर शरीराला डिटॉक्सची गरज असते. त्यासाठी श्रावण महिना हा योग्य काळ मानला जातो. मांसाहारात प्रोटीन आणि चरबीचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे शरीर भारी होऊन अनेक समस्या निर्माण होतात. शाकाहारी आहारामुळे शरीर हलके राहून शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यास मदत होते.
advertisement
नैसर्गिक परिसंस्थेचा सन्मान आणि प्राणीसंवर्धनाला चालना
तसेच पावसाळा म्हणजे अनेक प्राणी आणि पक्षांचा प्रजननाचा काळ असतो. मासे अंडी घालतात. अशा काळात मांसाहार न करणे म्हणजे नैसर्गिक परिसंस्थेचा सन्मान आणि प्राणीसंवर्धनाला चालना देणे होय. त्याचबरोबर मांसाहार टाळल्याने शरीरात तनावजन्य हार्मोन्स कमी होऊन मनःशांती होते.
श्रावण महिन्यात मांसाहार टाळण्याची परंपरा ही केवळ धार्मिक नाही तर तिच्यामागे अनेक कारणे आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे वैज्ञानिक कारणे, तसेच आरोग्यवर्धक आणि पर्यावरणस्नेही कारणेही असल्याचं आपण बघितलं, असे डॉ. सारंग बहुरूपी सांगतात.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
Jul 23, 2025 8:56 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Shravan Month 2025: श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये? ही 5 कारणे तुम्हाला माहितीये का?








