Health Tips: पावसाळ्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होतेय? त्यापूर्वी ऐका आहार तज्ज्ञांचा सल्ला
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:
Last Updated:
पावसाळ्यातात अनेकदा आपल्याला चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होते. आहार तज्ज्ञांच्या मते, ही बाब आरोग्यासाठी योग्य नाही.
छत्रपती संभाजीनगर: सध्या पावसाळा ऋतू सुरू आहे. पावसाळ्यातील वातावरण अतिशय अल्हादायक असते. अशा वातावरणामध्ये आपल्याला चमचमीत खाद्यपदार्थ खाण्याची इच्छा होते. अनेकजण आपल्या आवडीच्या खाद्यपदार्थांवर ताव देखील मारतात. पण, ही बाब आरोग्यासाठी घातक ठरू शकते. कारण, पावसाळ्यामध्ये वातावरणात आर्द्रता आणि गारवा जास्त असतो. त्यामुळे आहार घेताना आपण काळजी घेतली पाहिजे. पावसाळ्यात आहार कसा असावा, या विषयी आहार तज्ज्ञ जया गावंडे यांनी माहिती दिली आहे.
पावसाळ्यामध्ये आपल्या सर्वांना चमचमीत आणि तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा होते. पण, आहार तज्ज्ञांच्या मते, आपण तळलेले पदार्थ खाणे टाळलं पाहिजे. पावसाळ्यात वातावरणात असलेल्या आर्द्रतेमुळे पोट दुखी होऊ शकते. काहीवेळा जुलाब-उलट्यांचा त्रासही होऊ शकतो. त्यामुळे पावसाळ्यात आपण साधा आणि सात्विक आहार घेणे गरजेचं आहे.
पावसाळ्यात तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे सूप, मूग, मटकी, चवळी अशी कडधान्ये, ज्वारीची भाकरी, हातसडीचा तांदूळ, नाचणीचे पदार्थ यांचा तुमच्या आहारात समावेश करू शकता. तुम्ही सिझनल फळं देखील खाऊ शकता.
advertisement
पावसाळ्यामध्ये अनेकांना नॉनव्हेज खाण्याबाबत प्रश्न पडतो. याबाबत बोलताना आहार तज्ज्ञ म्हणाल्या की, पावसाळ्यात आहारामध्ये नॉनव्हेजचा समावेश करण्यास हरकत नाही पण, त्याचे प्रमाण फारच कमी असावे. नॉनव्हेज पचण्यासाठी जड असते. पावसाळ्यात आपली पचनशक्ती फारशी चांगली नसते. पोटदुखी सारखे आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे जर नॉनव्हेज खाण्याची इच्छा असेल तर सकाळच्या वेळेतच खावे. रात्रीच्या जेवणात नॉनव्हेज खाणे टाळावे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Jul 31, 2025 6:46 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पावसाळ्यात चमचमीत पदार्थ खाण्याची इच्छा होतेय? त्यापूर्वी ऐका आहार तज्ज्ञांचा सल्ला






