अन्न पचायला होईल मदत; पाहा गुळाचे काय आहेत आश्चर्यकारक फायदे Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गूळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत.
छत्रपती संभाजीनगर, 17 नोव्हेंबर : गूळ खाण्याचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. साखरेपेक्षा गूळ हा शरीरासाठी फायदेशीर असल्याचे सांगितलं जातं. आता हळूहळू थंडी पडायला सुरुवात होत आहे तर या थंडीच्या दिवसांमध्ये गूळ खाणं हे आपल्या शरीरासाठी अत्यंत चांगलं असतं. त्यामुळे आपण कोणता गूळ खायला पाहिजे आणि याचे शरीराला काय फायदे आहेत याबद्दलच छत्रपती संभाजीनगर येथील आहारतज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
गुळाचे शरीराला काय फायदे?
गूळ आपल्या शरीराला खाणे खूप गरजेचे आहे. गूळ हा साखरेपेक्षा निश्चितच आपल्या शरीरासाठी फायदेशीर आहे. गुळामध्ये आयर्न फॅक्टर हा जास्त आहे आणि तो आपल्या शरीरासाठी चांगला आहे. गुळामध्ये पण वेगवेगळे प्रकार आहेत. काळा आणि ब्राऊन कलरचा गूळ असतो. ज्या गुळामध्ये चिकटपणा जास्त आहे, असा गूळ आपण खायला पाहिजे. गूळ हा आपल्या शरीरातील दाह कमी करायला मदत करतो. गूळ हा शरीरातील तापमान तात्काळ कमी करायला मदत करतो. त्यामुळे जर तुम्ही उन्हातून आला असेल तर एक गुळाचा खडा आणि पाणी पिले तर निश्चितच तुमच्या शरीराचा दाह कमी होतो, अशी माहिती अलका कर्णिक यांनी सांगितली.
advertisement
हिवाळ्यात आजार दूर ठेवायचेत? मग नक्की खा आवळे, हे 5 फायदे वाचून चकित व्हाल
त्यासोबत जर तुम्ही कोणते सुप करत असाल तर त्यामध्ये साखरेऐवजी गुळाचा वापर करू शकता. यामुळे तुम्हाला निश्चित फायदा होतो. तसेच कोणत्या पदार्थांमध्ये तुम्हाला साखर घालायची असेल तर त्याच्या ऐवजी तुम्ही गुळाचा वापर हा करावा. गुळामध्ये भरपूर प्रमाणामध्ये खनिज आहेत आणि हे आपल्या शरीरासाठी चांगले आहे. जेवणानंतर जर तुम्ही एक गुळाचा खडा खाल्ला तर निश्चित तुम्हाला अन्न पचायला मदत होते, असं अलका कर्णिक सांगतात.
advertisement
मेथीचे दाणे आरोग्यासाठी आहेत अतिशय लाभदायक; कसं कराल लोणचं?
आपला कामाचा तास किती आहे किंवा आपल्या शरीराचा कोणत्या व्याधी आहेत यानुसार तुम्ही गुळाचे सेवन करा. त्यासोबतच आपण रोज चहा घेत असतो तर त्यामध्ये साखरेच्या ऐवजी गुळाचा वापर हा करावा. तसेच चहा सोबत थोडासा गवती चहा आणि ओव्याचा वापर केला तर ते देखील चांगला असतो. गुळाची पोळी देखील करून खाऊ शकता, असंही अलका कर्णिक यांनी सांगितलं.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 17, 2023 8:47 AM IST