हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लिसरीन लावताय? तर सावधान, बघा तज्ज्ञ काय सांगतात
- Reported by:Pragati Bahurupi
- Published by:Mohan Najan
Last Updated:
हिवाळ्यात त्वचा कोरडी झाली की मुली त्यावर अनेक प्रॉडक्ट लावून बघतात. सर्वात जास्त ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्या जाते. ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावणे योग्य अयोग्य याबाबत जाणून घेऊ.
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
अमरावती : हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते तेव्हा त्वचेचा ओलावा टिकून राहण्यासाठी त्यावर अनेक उपाय केले जातात. जास्तीत जास्त मुलींकडून विविध प्रॉडक्ट वापरले जातात. पण सर्वाधिक वापरले जाणारे प्रॉडक्ट म्हणजे ग्लिसरीन. हिवाळा सुरू झाला की, ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्याने त्वचा ओलावा धरून राहते असा अनेकांचा समज आहे. आणि तसे होतही असेल. पण तुम्हाला माहिती आहे का? ग्लिसरीन आणि गुलाब जल त्वचेवर लावल्याने आपल्या त्वचेला हानी देखील पोहचते. याबाबत अधिक माहिती आपण त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
त्वचारोग तज्ज्ञ डॉ. अनुराधा टाकरखेडे यांच्याशी लोकल 18 ने संवाद साधला तेव्हा त्या सांगतात की, हिवाळ्यात त्वचा कोरडी पडते तेव्हा त्वचेला खाज सुटते, त्वचा रखरख वाटते. तेव्हा त्वचेचा ओलावा टिकून ठेवणे महत्वाचे असते. त्यासाठी मॉइश्चरायझरचा वापर करावा. पण काही वेळा, ओठ आणि चेहऱ्यासाठी मुली ग्लिसरीन वापरतात. त्यामुळे त्वचा काळी पडते.
advertisement
ओठ कोरडे पडल्यानंतर त्याला ग्लिसरीन लावणे चुकीचे आहे. त्याचबरोबर मार्के मध्ये मिळणाऱ्या लिपबाल्म सुद्धा ओठासाठी हानिकारक असतात. त्यामुळे गाईचे तूप हेच ओठांसाठी बेस्ट असतात.
पुढे त्या सांगतात की, चेहऱ्यावर ग्लिसरीन लावल्याने पिंपल्स येतात. काही वेळा जर ग्लिसरीन हलक्या दर्जाचे असेल तर चेहरा लाल होतो आणि पुरळ येतात. त्यामुळे चेहऱ्यावर ग्लिसरीन लावू नये. आपल्या त्वचेचा प्रकार ओळखून हिवाळ्यात मॉइश्चरायझरचा वापर करावा. कोरडी त्वचा असल्यास ऑईल बेस मॉइश्चरायझर वापरावे. तेलकट त्वचा असेल तर वॉटर बेस मॉइश्चरायझर वापरावे, नॉर्मल स्किन असेल तर दोन्ही प्रकारचे मॉश्चरायझर तुम्ही वापरू शकता.
advertisement
हिवाळा सुरू होताच एकदा त्वचा रोग तज्ञांचा सल्ला घेऊनच प्रॉडक्ट वापरावे, असे डॉ. अनुराधा टाकरखेडे यांनी सांगितले.
view commentsLocation :
Amravati,Maharashtra
First Published :
Nov 09, 2024 1:57 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
हिवाळ्यात चेहऱ्यावर ग्लिसरीन लावताय? तर सावधान, बघा तज्ज्ञ काय सांगतात









