Health Tips: पाठदुखीने त्रस्त आहात? हे करा घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम
- Published by:Mohan Najan
- Reported by:Prashant Pawar
Last Updated:
पाठ दुखीची वेदना सुरुवातीला किरकोळ वाटत असली तरी योग्य उपचार न केल्यास ती गंभीर होऊ शकते. यावर घरगुती उपाय काय करावे? जाणून घ्या.
बीड: सतत बसून काम करणे, जास्त वजन उचलणे किंवा चुकीच्या पद्धतीने झोपणे यामुळे हल्ली कमरेच्या आणि पाठीच्या आजारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. वर्क फ्रॉम होम या पद्धतीमुळे त्याचबरोबर ऑफिसमध्ये तासनतास बसून काम करणाऱ्या व्यक्तींमध्ये, तर ग्रामीण भागात राबणाऱ्या शेतकऱ्यांमध्येही हा त्रास आढळतो. ही वेदना सुरुवातीला किरकोळ वाटत असली तरी योग्य उपचार न केल्यास ती गंभीर होऊ शकते. यावर घरगुती उपाय काय करावे? याबद्दलचं बीड शहरातील डॉक्टर हनुमान सांगळे यांनी माहिती दिली आहे.
कमरेच्या आणि पाठीच्या दुखण्यावर तात्पुरत्या वेदनाशामक गोळ्यांपेक्षा काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय खरोखर करामती ठरू शकतात. रोज रात्री झोपण्याआधी गरम हळदीचं दूध पिणं, यामुळे शरीरातील सूज कमी होते आणि सांधेदुखीवर आराम मिळतो. तसेच गरम पाण्याची पिशवी कमरेवर 10–15 मिनिटं ठेवल्यास स्नायू सैल होतात आणि वेदना कमी होते.
advertisement
तिळाचं तेल थोडं गरम करून हलक्या हाताने मालीश केल्यानेही कमरेला दिलासा मिळतो. विशेषतः खोबरेल तेलात लसूण परतून तयार केलेलं तेल दुखणाऱ्या भागावर लावल्यास फार मोठा फरक जाणवतो. हे तेल नियमित वापरल्यास जुनाट पाठीदुखीही कमी होते, असं अनेकांनी अनुभवले आहे. त्यामुळे अशा घरगुती उपायांनी फरक पडतो, असं डॉक्टर हनुमान सांगळे सांगतात.
advertisement
यासोबतच काही योगासनेसुद्धा उपयोगी ठरतात. भुजंगासन, मकरासन, शलभासन ही पाठीला बळकटी देणारी आणि रक्ताभिसरण सुधारणारी आसने आहेत. ही आसने रोज फक्त 10 मिनिटं केल्यानेही कमरदुखीवर प्रभावी परिणाम होतो. हे उपाय नियमित केल्यास औषधांवरील अवलंबित्वही टाळता येतं.
तथापि जर त्रास सतत वाढत असेल, पायाला सुन्नपणा जाणवत असेल किंवा चालताना त्रास होऊ लागला, तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. घरगुती उपाय हे सुरुवातीच्या टप्प्यावर प्रभावी असले तरी गंभीर स्थितीत वैद्यकीय उपचार महत्त्वाचे असतात. योग्य वेळेत काळजी घेतली, तर कमरेच्या आणि पाठीच्या आजारांवर नक्कीच मात करता येते, असंही डॉक्टर हनुमान सांगळे यांनी सांगितलं.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
July 26, 2025 6:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: पाठदुखीने त्रस्त आहात? हे करा घरगुती उपाय, लगेच मिळेल आराम

