Health Tips: सांधेदुखी अन् त्वचा लालसर होतीये? वेळीच व्हा सावध, हा आजार ठरू शकतो घातक

Last Updated:

पावसाळ्यामध्ये अनेकवेळा आपल्या गुडघ्यावर अचानक लालसरपणा जाणवतो. त्रास होण्यास सुरुवात होते. हात पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी आपण एखादी पेन किलर घेऊन दुखणे टाळतो. पण, ती वात व्याधीची लक्षण असू शकतात.

+
News18

News18

अमरावती: पावसाळ्यामध्ये अनेकवेळा आपल्या गुडघ्यावर अचानक लालसरपणा जाणवतो. त्रास होण्यास सुरुवात होते. हात-पायांमध्ये वेदना होतात. अशावेळी आपण एखादी पेन किलर घेऊन दुखणे टाळतो. पण, ती वात व्याधीची लक्षणे असू शकतात. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. तसेच काही बाबींची काळजी घेणे देखील महत्त्वाचे आहे. वात व्याधीची लक्षणे कोणती? वात व्याधी असल्यास कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती डॉ. धीरज आंडे यांनी दिली आहे.
वातव्याधीची लक्षणे कोणती?
वात व्याधीची लक्षणे कोणती? वात व्याधी असल्यास कोणती काळजी घ्यावी? याबाबत माहिती देताना डॉ. आंडे सांगतात की, पावसाळ्यात वात व्याधी जास्त प्रमाणात वाढते. पावसाळ्यात वातावरणात आर्द्रता निर्माण होते. त्यामुळे सांधेदुखी, अंगावर सूज येणे, त्वचा लालसर होणे, दुखणे, छोटे-मोठे जॉइंट दुखणे, कणकण वाटणे अशी अनेक लक्षणे आढळून येतात. अनेकदा या लक्षणावर दुर्लक्ष केले जाते. पण, काही वेळा ही लक्षणे रुग्णांना कायमच जागेवर बसवू शकतात. त्यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे.
advertisement
कोणती काळजी घ्यावी?
वात व्याधी असणाऱ्या रुग्णांनी पावसाळ्यात थंड पदार्थ सेवन करणे टाळले पाहिजे. त्याचबरोबर घरातील कामे करताना सुद्धा थंड पाण्यासोबत जास्त संपर्क येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. पाणी उकळून पिणे सुद्धा सुरू करायला पाहिजे. त्याचबरोबर आंघोळीला सुद्धा गरम पाणी घ्यायला पाहिजे. थंड पाण्यासोबत संपर्क कमी झाला की, वात व्याधी नियंत्रणामध्ये राहण्यास मदत होईल.
advertisement
आहारात कशाचा समावेश असावा?
त्याचबरोबर आहारात गरम पदार्थांचा समावेश करू शकता. त्यामध्ये मिरे, लसूण, अद्रक आणि इतरही काही पदार्थांचा समावेश तुम्ही करू शकता. त्याचबरोबर योगा करणे, योग्य आहार घेणे, पुरेशी झोप घेणे सुद्धा गरजेचे आहे.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे शरीराच्या कोणत्याही भागात सूज आली असेल किंवा दुखत असेल आणि याला 7 दिवसांवर दिवस झाले असतील तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुमच्या काही टेस्ट झाल्यानंतर तुम्हाला नेमका कोणत्या प्रकारचा वात आहे, हे लक्षात येईल. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. शरीरात काही बदल जाणवल्यास किंवा त्रास होत असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असे डॉ. धीरज आंडे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
Health Tips: सांधेदुखी अन् त्वचा लालसर होतीये? वेळीच व्हा सावध, हा आजार ठरू शकतो घातक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement