advertisement

Dry Lips : ओठ कोरडे होऊन फाटतात, असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, जाणून घ्या उपाय

Last Updated:

ओठ फाटण्यामागे अनेक कारणं असतात. यात व्हिटॅमिन्सची कमतरता, शरीरातलं पाणी कमी होणं आदींचा समावेश होतो. तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल तर त्याची कारणं कोणती आणि उपाय जाणून घेऊया. 

ओठ कोरडे होऊन फाटतात, असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, जाणून घ्या उपाय
ओठ कोरडे होऊन फाटतात, असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, जाणून घ्या उपाय
आता हिवाळा सुरू होत आहे. हळूहळू थंडी जाणवायला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात त्वचा कोरडी पडणं, ओठांना भेगा पडणं किंवा ते फाटणं ही सामान्य बाब असते. हिवाळ्यात ओठांना चिरा पडून त्यातून रक्त येणं, किरकोळ जखमा होणं, ओठ कोरडे पडणं अशा समस्यादेखील जाणवतात. पण ओठांची ही समस्या केवळ हिवाळ्यातच नव्हे तर उन्हाळ्यात देखील जाणवते. ओठ फाटण्यामागे अनेक कारणं असतात. यात व्हिटॅमिन्सची कमतरता, शरीरातलं पाणी कमी होणं आदींचा समावेश होतो. तुम्हाला देखील ही समस्या जाणवत असेल तर त्याची कारणं कोणती आणि त्यावर काय उपाययोजना करायच्या ते जाणून घेऊया.
हिवाळ्यात ओठ फाटणं, त्यातून रक्त येणं, ओठांना चिरा पडणं आणि ते कोरडे पडणं हे सामान्य आहे. शरीरातले पाणी कमी झाले, त्वचा कोरडी पडली किंवा व्हिटॅमिन्सची कमतरता निर्माण झाली तर अशा समस्या उद्भवतात. उत्तम आरोग्यासाठी शरीरात पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन असणं गरजेचं असतं. ज्यावेळी व्हिटॅमिन कमी होतात तेव्हा ओठ फाटणे हे त्याचे पहिले लक्षण दिसून येते. युवक-युवतींमध्ये ही समस्या अधिक दिसून येते. ओठ उलणं किंवा फाटणं हे व्हिटॅमिन बीची कमतरता असल्याचे संकेत असतात. शरीरावरील अन्य त्वचेच्या तुलनेत ओठाची त्वचा जास्त पातळ असते. त्यामुळे व्हिटॅमिन कमतरतेचा थेट आणि पहिला परिणाम ओठांवर दिसतो.जखम भरुन येण्यासाठी व्हिटॅमिन बी उपयुक्त ठरते. हे व्हिटॅमिन कमी झाले तर ओठ फाटतात.
advertisement
व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशी तयार होण्याची प्रक्रिया मंदावते. ओठात तयार होणाऱ्या नव्या पेशींच्या प्रक्रियेवरही त्याचा परिणाम दिसतो. व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे अॅनामिया होण्याचा धोका असतो. त्यामुळे ओठाची त्वचा कोरडी पडून ते फाटू लागतात.
व्हिटॅमिन बी 9 हे फॉलिक अॅसिड या नावाने ही ओळखले जाते. या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळं ओठ फाटणं, लिव्हरच्या समस्या आणि केस गळण्यास सुरूवात होते. ओठाची त्वचा मुलायम राहण्यासाठी व्हिटॅमिन बी 9 युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणं गरजेचं आहे.
advertisement
व्हिटॅमिन बी 6 च्या कमतरतेमुळे शरीरात अनेक समस्या निर्माण होता. शरीराचे चलनवलन योग्य पद्धतीनं होण्यासाठी हे व्हिटॅमिन एखाद्या बॅटरीप्रमाणं काम करतं. भूक, झोप आणि मूड चांगला राहण्यासाठी हे व्हिटॅमिन आवश्यक असतं. या समस्या निर्माण झाल्यातर त्याचे पहिले लक्षण ओठावर दिसते आणि ते फाटू लागतात.
advertisement
ओठ फाटू नये तसेच ते कोरडे पडू नये यासाठी रोज पुरेशा प्रमाणात पाणी पिणं गरजेचं आहे. याशिवाय ओठांची समस्या दूर करण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय करू शकता. ओठ मॉश्चराईज्ड करण्यासाठी तुम्ही ओठांना खोबऱ्याचे तेल किंवा साजूक तूप लावू शकता. या दोन्हीमध्ये भरपूर औषधी गुणधर्म असतात. त्यामुळे ओठांचा कोरडेपणा दूर होतो.
advertisement
ओठांचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी योग्य आहार महत्त्वाचा आहे. ओठ फाटण्याची समस्या दूर करतील अशा पदार्थांचा आहारात समावेश केल्यास नक्कीच चांगला फरक पडू शकतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Dry Lips : ओठ कोरडे होऊन फाटतात, असू शकते 'या' व्हिटॅमिनची कमतरता, जाणून घ्या उपाय
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement