ब्रेड स्लाइसला का असतात छिद्र? जाणून घ्या नेमकं कारण
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
भारतात बनवल्या जाणाऱ्या ब्रेडला म्हणजे चपातीला छिद्र नसतात. मात्र ब्रेड कोणत्याही प्रकारचा असला तरी त्यात अनेक छिद्र दिसतात. यामागचे कारण फार कमी लोकांना माहिती आहे. ब्रेड बनवण्यासाठी वापरले जाणारे यीस्ट हे यामागचे कारण नसून, त्यासाठी ब्रेड बनवण्याच्या पिठात पाणी घालून मळण्याची पद्धत कारणीभूत आहे. यामुळे जी रचना तयार होते, त्यामुळे ब्रेडच्या आत छिद्रासारखे आकार तयार होतात. या प्रक्रियेविषयी सविस्तर जाणून घेऊया.
भारतात चपातीचे सेवन जास्त प्रमाणात केले जात असले तरी, जगातल्या अनेक देशांमध्ये चपाती ही संकल्पना नाही. उलट तेथील लोक चपातीऐवजी डबल रोटी अर्थात ब्रेड खातात. इतर देशांमध्ये ब्रेड खाणं सामान्य आहे. भारतातदेखील नाश्त्यावेळी ब्रेड खाण्याचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. चपातीला कोणत्याही प्रकारचं छिद्र नसतं, मात्र ब्रेडला शेकडो लहान छिद्र असतात. ब्रेडमध्ये ही छिद्र कशी तयार होतात आणि ती तयार होण्यामागे काय कारण आहे?
advertisement
advertisement
advertisement
advertisement
ब्रेडसाठीचं पीठ मळताना हवेचे परिसंचरण या विषयावर बरेच संशोधन केले गेले आहे. ब्रेडच्या औद्योगिक उत्पादनात याला खूप महत्त्व देखील आहे. पीठ मळण्याच्या प्रक्रियेदरम्यान प्रणालीमध्ये भरपूर यांत्रिक ऊर्जा असते, जी गव्हाच्या ग्लुटेन प्रथिनापासून बनवलेल्या ग्लुटेन नेटवर्कमध्ये गॅसचे फुगे तयार करण्यात महत्त्वाचे योगदान देते. ग्लुटेनमधील घटक ग्लुटेनिनमुळे पिठात लवचिकपणा आणि ग्लियाडिन प्लास्टरसारखे गुणधर्म तयार होतात.
advertisement
advertisement
पिठातील हवेच्या बुडबुड्यांमध्ये कार्बन डायऑक्साइड येतो. जर हे बुडबुडे तयार झाले नाहीत तर कार्बन डायऑक्साइड पृष्ठभागावर पोहोचतो आणि बाहेर येतो. त्याचवेळी जेव्हा पाण्याचे तापमान जास्त असते तेव्हा ब्रेड मऊ होतो. यामध्ये पाण्याचे शोषण हा देखील एक घटक आहे. सायट्रिक अॅसिड किंवा चेरी पावडरसारख्या कमी प्रमाणात असलेल्या घटकांमुळे ब्रेडची लवचिकता सुधारते. काही इमल्सिफायर ब्रेडच्या पिठात बुडबुड्यांचं प्रमाण वाढवण्याचं काम करतात. त्यामुळे ब्रेडमध्ये आणखी छिद्र दिसू शकतात.