advertisement

Tea : चहा जास्त वेळ उकळणं आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली चहा बनवण्याची योग्य पद्धत

Last Updated:

काही जण चहा बराच वेळ उकळतात; मात्र चहा बराच वेळ उकळणं शरीरासाठी हानिकारक ठरतं.

चहा
चहा
चहा हे बहुतांश जणांचं आवडतं पेय असतं. कित्येक जणांच्या दिवसाची सुरुवात चहानेच होते. अनेक जण तर चहाचे शौकीनच असतात. शिवाय अनेकांना असलेल्या चहाच्या आवडीचं रूपांतर जवळपास व्यसनातच झालेलं असतं. त्यामुळे दिवसातून किती तरी वेळा ते चहा पितात. चहाने तरतरी येते. कामाला उत्साह येतो. एकदम ताजंतवानं वाटतं, असा अनेकांचा अनुभव असतो. चहाची तलफ आली आणि त्या वेळी चहा मिळाला नाही, तर अनेकांना अस्वस्थ वाटतं. जास्त प्रमाणात चहा प्यायला तर त्याचे दुष्परिणाम होतात, हे माहिती असलं तरी चहाची सवय सहजासहजी सुटत नाही. सार्वजनिक ठिकाणी चहाचे स्टॉल्स जिकडेतिकडे असतात, जेणेकरून कोणालाही कधीही चहा प्यावासा वाटला, तर चहा उपलब्ध व्हावा. पुण्यात तर चहाच्या स्टॉल्सचं नाव 'अमृततुल्य' असं असतं. यावरूनच चहाची महती लक्षात येते. आंतरराष्ट्रीय चहा दिवसदेखील साजरा केला जातो.
चहा प्यायल्यामुळे थकवा दूर होतो, झोप आल्यासारखं वाटत असेल, तर झोप उडते. काही जणांना कडक चहा प्यायला आवडतो. त्यासाठी काही जण चहा बराच वेळ उकळतात; मात्र चहा बराच वेळ उकळणं शरीरासाठी हानिकारक ठरतं. मग चांगला आणि कडक चहा बनवायचा कसा, ते जाणून घेऊ या. अगोदर पाण्यात चहा पावडर घालावी आणि ते पाणी उकळावं. पाण्यात चहाचा अर्क उतरला, की त्याचा रंग बदलेल. पाण्याचा रंग बदलला, की चहा फक्त दोन मिनिटं उकळावा. तसं केलं तर चांगला, कडक चहा तयार होईल. त्यापेक्षा जास्त वेळ चहा उकळणं प्रकृतीसाठी हानिकारक ठरू शकतं, असं तज्ज्ञ म्हणतात.
advertisement
चहाला चांगली चव येण्यासाठी अनेक जण चहा पावडरमध्ये लवंग आणि वेलची टाकून ठेवतात; मात्र असं केल्याने लवंग-वेलची या दोन्हींचा सुगंध येत नाही. म्हणून हे घटक वेगवेगळे ठेवावेत. डायबेटीसग्रस्तांना साखरेचा चहा हानिकारक ठरतो. त्यामुळे अशा व्यक्तींसाठी चहा करताना त्यामध्ये साखरेऐवजी मध, ब्राउन शुगर, गूळ, लिकोरिस या गोड पदार्थांचा वापर करता येऊ शकतो. यामुळे चहाला गोडवा येईल आणि सामान्य चहापेक्षा त्याला एक वेगळी चव असेल. अर्थात आहारतज्ज्ञ किंवा आपले डॉक्टर यांच्या सल्ल्यानेच हे करावं.
advertisement
आलं, वेलची, तुळस हे पदार्थ चहाची चव वाढवतात. एकत्र बारीक करून उकळत्या पाण्यात हे पदार्थ घातल्यास त्यांची चांगली चव येते. तुळशीचा चहा आवडत नसेल तर त्याऐवजी दोन लवंगा आणि थोडी दालचिनी पावडर चहामध्ये घालू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Tea : चहा जास्त वेळ उकळणं आरोग्यासाठी हानिकारक? तज्ज्ञांनी सांगितली चहा बनवण्याची योग्य पद्धत
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement