Ghee : तूप खराब झालंय हे कसं ओळखायचं? जुनं तूप टाकायचं की खायचं?

Last Updated:

हे तूप अजून वापरायचं का फेकून द्यायचं? आणि त्याचं खराब होणं कसं ओळखायचं? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरातला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : स्वयंपाकघरातील महिलांसाठी तूप हा रोजच्या स्वयंपाकाचा अविभाज्य भाग असतो. पराठे असो, चपाती असो किंवा गोड पदार्थ तुपाशिवाय चवच नाही असं अनेकांना वाटतं. पण एकदा तूप जुनं झालं की मनात एक प्रश्न नक्कीच येतो. हे तूप अजून वापरायचं का फेकून द्यायचं? आणि त्याचं खराब होणं कसं ओळखायचं? हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरातला आहे, त्यामुळे त्याचं उत्तर जाणून घेणं गरजेचं आहे.
तूप किती दिवस चांगलं राहतं?
तूप हे लोणी कडवून बनवलं जातं, त्यामुळे त्याचं शेल्फ लाइफ साधारणपणे लांब असतं. योग्यरीत्या बंद डब्यात, थंड आणि कोरड्या जागी ठेवलं तर तूप 9 ते 12 महिने उत्तम राहतं. फ्रिजमध्ये ठेवल्यास ते आणखी जास्त काळ टिकू शकतं.
तूप खराब झालंय कसं ओळखाल?
वास बदलणे: ताज्या तुपाला खास सुगंध असतो, पण ते जुनं होऊ लागलं की आंबूस किंवा दुर्गंधीयुक्त वास येतो.
advertisement
रंग बदलणे: खराब तुपाचा रंग गडद किंवा थोडा हिरवट दिसतो.
चव: तुपाची चव कडवट किंवा विचित्र लागते.
घट्टपणा: जुनं तूप दाणेदार किंवा चिकट होतं.
खराब तुपाचा वापर का टाळावा?
खराब झालेलं तूप खाल्ल्याने पोटदुखी, अजीर्ण, फूड पॉयझनिंगसारख्या समस्या होऊ शकतात. अशा तुपाचा वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.
जुनं पण खराब न झालेलं तूप वापरण्याचे उपाय
जुनं पण अजून चांगलं असलेलं तूप स्वयंपाकात वापरू शकता. जर ते तूप आणखी जास्त वेळ वापरायचा असेल तर तो फ्रिजमध्ये स्टोअर करा.
advertisement
नेहमी कोरड्या चमच्यानेच तूप काढा, जेणेकरून ओलसरपणामुळे ते लवकर खराब होणार नाही.
तूप हा आपल्या स्वयंपाकघरातील अमूल्य घटक आहे, पण तो जास्त दिवस साठवल्यास तो खराब होऊ शकतो. त्यामुळे तुपाचा वास, रंग आणि चव पाहूनच वापरावा. शंका आली तर ते फेकून देणं जास्त सुरक्षित आहे. योग्य पद्धतीने स्टोअर केल्यास तूप महिन्याभर तरुण राहू शकतं.
advertisement
(नोट : वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहे, न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही, आमचा उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ghee : तूप खराब झालंय हे कसं ओळखायचं? जुनं तूप टाकायचं की खायचं?
Next Article
advertisement
Kolhapur News: खेळताना घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन् काळानं गाठलं, १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर
  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

  • घरावर गेलेला चेंडू काढायला गेला अन्.., १३ वर्षाच्या अफानसोबत घडलं भयंकर

View All
advertisement