Maintain Weight Loss : वजन कमी केलंय, पण ते टिकवून ठेवणं अवघड जातंय? 'या' टिप्सने मेंटेन राहील फिगर

Last Updated:

How To Maintain Weight Loss After Reaching Your Goal : वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान असले तरी बरेच लोक यावर मात्र करतात आणि आपलं वजन घटवतात. पण बऱ्याचदा हे वजन टिकवून ठेवणं अवघड जातं.

वजन कमी झाल्यावर ते कसे टिकवून ठेवावे?
वजन कमी झाल्यावर ते कसे टिकवून ठेवावे?
मुंबई : वाढलेल्या वजनाने अनेकदा आत्मविश्वास कमी होतो, पण एकदा तुम्ही वजन कमी करण्यात यशस्वी झालात की, तुम्ही खूप आनंदी आणि उत्साही असता. अनेकदा कौटुंबिक सदस्य आणि मित्रांकडून मिळणाऱ्या कौतुकाने तुमचा आनंद द्विगुणीत होतो. वजन कमी करणे हे एक मोठे आव्हान असले तरी बरेच लोक यावर मात्र करतात आणि आपलं वजन घटवतात. पण बऱ्याचदा हे वजन टिकवून ठेवणं अवघड जातं.
वजन कमी करणे जितके अवघड असते, त्याहून अधिक ते टिकवून ठेवणे कठीण असते. पण चिंता करण्याऐवजी, तुम्ही काही सवयी आणि जीवनशैलीतील बदल करून हे यश टिकवून ठेवू शकता. चला तर मग पाहूया, कमी झालेले वजन कसे टिकवून ठेवावे..
वजन कमी झाल्यावर ते कसे टिकवून ठेवावे?
वजन कमी करण्याचा टप्पा गाठल्यानंतर, ते टिकवून ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. हेल्थ कोच यश वर्धन स्वामी यांच्या मते, या टप्प्यात तुम्ही घेतलेल्या कॅलरीज आणि बर्न केलेल्या कॅलरीज यांचे संतुलन राखणे महत्त्वाचे आहे. हा टप्पा जवळपास 6-8 आठवडे चालतो, ज्यामध्ये तुम्हाला तुमच्या आहार किंवा व्यायामाच्या वेळापत्रकात अचानक कोणताही मोठा बदल करायचा नाही. यश स्वामी यांनी वजन टिकवून ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत.
advertisement
नियमित व्यायाम : वजन कमी करण्यासाठी तुम्ही व्यायाम करत असा किंवा नसा, पण वजन टिकवून ठेवण्यासाठी तो तुमच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणे आवश्यक आहे. जास्त खाणे झाल्यास, व्यायाम तुम्हाला अतिरिक्त कॅलरीज बर्न करण्यास मदत करतो. आठवड्यातून 150 मिनिटे मध्यम-तीव्रतेचा व्यायाम आणि 2 दिवस स्ट्रेंथ ट्रेनिंग करण्याचा सल्ला दिला जातो.
जीवनशैलीतील बदल : वजन कमी करणे असो किंवा ते टिकवून ठेवणे, सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही अशी आहार पद्धती आणि व्यायामाची दिनचर्या पाळली पाहिजे, जी तुमच्यासाठी दीर्घकाळ टिकून राहील. खूप कठोर आहार घेतल्यास तो व्यवस्थित पाळला जात नाही आणि त्यामुळे हार्मोनल असंतुलन होऊ शकते. त्याचप्रमाणे फक्त वजन कमी करण्यासाठी अतिशय कठोर व्यायाम करणे आणि ध्येय गाठल्यानंतर तो पूर्णपणे बंद करणे, हे आरोग्यासाठी योग्य नाही.
advertisement
रिव्हर्स डाएटिंग : हा एक असा चांगला उपाय आहे, ज्यामध्ये तुम्ही कमी झालेल्या वजनानंतर हळूहळू आणि योग्य प्रमाणात तुमच्या आहारात कॅलरी वाढवता, ज्यामुळे वजन पुन्हा वाढत नाही. याचा मुख्य उद्देश तुमच्या शरीराचा चयापचय दर पूर्ववत करणे आहे. कमी कॅलरीच्या आहारात असताना शरीराचा चयापचय मंदावतो, पण रिव्हर्स डाएटिंगमुळे तो पुन्हा सामान्य होतो, ज्यामुळे कॅलरी वाढल्यावरही वजन वाढत नाही.
advertisement
डाएट ब्रेक : 'चीट मील्स'प्रमाणेच, 'डाएट ब्रेक' किंवा 'रिफिड्स' हे असे दिवस असतात, ज्यात तुम्ही जाणीवपूर्वक ठराविक प्रमाणात कॅलरीज वाढवता. यातील बहुतेक अतिरिक्त कॅलरीज कार्बोहायड्रेट्समधून येतात. काही लोक आठवड्यातून एकदा 'रिफिड' घेतात, तर काही 2-3 वेळा.
वजन कमी करण्याचे ध्येय गाठणे हे एक वरदानासारखे वाटते, पण ते टिकवून ठेवण्यासाठी खूप संयम लागतो. योग्य काळजी आणि एखाद्या आरोग्य तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाने तुम्ही तुमचे वजन यशस्वीरीत्या नियंत्रित करू शकता.
advertisement
अस्वीकरण : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Maintain Weight Loss : वजन कमी केलंय, पण ते टिकवून ठेवणं अवघड जातंय? 'या' टिप्सने मेंटेन राहील फिगर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement