advertisement

Skin Care : त्वचा येईल उजळून, कोरियन नाही जपानी टेक्निकचा करा वापर, खास स्किन केअर टिप्स

Last Updated:

त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, कोरियन स्किन केअरप्रमाणेच जपानी पद्धत पण प्रसिद्ध आहे. त्वचा चमकदार दिसावी यासाठी, काही जपानी सौंदर्य टिप्सचाही वापर करता येईल.

News18
News18
मुंबई : त्वचेची काळजी घेण्यासाठी सध्या कोरियन स्किनकेअर ट्रेंड चर्चेत आहे. ग्लास स्किन मिळवण्यासाठी कोरियन उत्पादनांची चर्चा सुरु आहे.
त्वचेचा पोत सुधारण्यासाठी, कोरियन स्किन केअरप्रमाणेच जपानी पद्धत पण प्रसिद्ध आहे. त्वचा चमकदार दिसावी यासाठी, काही जपानी सौंदर्य टिप्सचाही वापर करता येईल. परदेशी आहेत म्हणून महाग असतात असं नाही. यासाठीचं साहित्य तुम्हाला स्वयंपाकघरात सहज सापडेल.
ग्रीन टी - ग्रीन टी त्वचेसाठी फायदेशी आहे. त्यातील अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म त्वचेला चमक देण्यासाठी उपयुक्त ठरतात. जपानी महिलांप्रमाणे, नियमित चहाऐवजी ग्रीन टीचा वापर करू शकता.
advertisement
तांदळाचं पाणी - कोरियन महिलांप्रमाणे, जपानी महिला देखील त्वचेची काळजी घेण्यासाठी तांदळाचं पाणी वापरतात. तांदळाच्या पाण्यातली जीवनसत्त्वं त्वचा मऊ आणि चमकदार बनवतात. ते वापरण्यासाठी, रात्रभर तांदूळ पाण्यात भिजवा. दुसऱ्या दिवशी, हे पाणी चेहऱ्याला लावा. हे पाणी तुमचे केस धुण्यासाठी देखील वापरू शकता.
सीफूड पावडर - जपानी महिला सीफूड पावडर आणि ऑलिव्ह ऑइलची पेस्ट बनवतात आणि पंधरा मिनिटं चेहऱ्यावर लावतात. ते सुकल्यानंतर धुवा. तुम्ही आठवड्यातून एकदा देखील ते लावू शकता.
advertisement
स्टीम बाथ - स्टीम बाथमुळे त्वचा उजळून यायला मदत होऊ शकते. जपानमधे, महिला त्यांच्या आंघोळीच्या पाण्यात आवश्यक तेलंही वापरतात.
चमकदार त्वचेचं रहस्य -
कोरियन असो वा जपानी, निरोगी त्वचेसाठी व्हिटॅमिन सी असलेली फळं आणि भाज्या खाणं हा एक महत्त्वाचा घटक आहे. म्हणून, आहारात लिंबू, द्राक्षं, लिंबूवर्गीय फळं आणि हिरव्या भाज्यांचा समावेश करा.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : त्वचा येईल उजळून, कोरियन नाही जपानी टेक्निकचा करा वापर, खास स्किन केअर टिप्स
Next Article
SRH vs LSG : 10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
10 करोडचा बॉलर 82 कोटींच्या दिग्गजांवर भारी पडला, काव्या मारनकडून बदला घेतला
  • रिषभ पंतने मॅच जिकवली

  • लखनऊच्या विजयाच्या पडद्यामागचा हिरो

  • 4 ओव्हरमध्ये अख्खी मॅच फिरवली

View All
advertisement