Kiwi fruit Benefits: अनेक आजारांवर गुणकारी आहे किवी, हिवाळ्यात खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, जवळही येणार नाहीत आजार

Last Updated:

Superfood kiwi Benefits in Marathi: ‘किवी फळात फायबर, लिपिड्स, व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी अशी विविध पोषक तत्वं भरपूर प्रमाणात आढळून येतात. त्यामुळे हिवाळ्यात किवी हे फळ खाणं फायद्याचं ठरतं.

प्रतिकात्मक फोटो :विविध आजारांवर गुणकारी आहे किवी, हिवाळ्यात होतील अनेक फायदे
प्रतिकात्मक फोटो :विविध आजारांवर गुणकारी आहे किवी, हिवाळ्यात होतील अनेक फायदे
मुंबई: हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी झाल्याने अनेक आजारांचा सामना करावा लागतो. मात्र अनेक आजारांची सुरूवात ही पोटातून होते असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. हिवाळ्यात थंडीमुळे पचनक्रिया आधीच मंदावलेली असते त्यामुळे हिवाळ्यात अपचन होऊन, पोटांचे विकार होऊन आजारी पडण्याची शक्यता ही अधिक असते. हिवाळ्यात तुम्हाला फिट आणि निरोगी राहायचं असेल तर सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या पोटाची काळजी घ्यावी लागणार आहे. पोटाचं आरोग्य आणि पचनाच्या तक्रारी दूर करण्यात किवीचा रस हा फायदेशीर ठरतो. जाणून घेऊयात हिवाळ्यात किवी खाण्याचे किंवा किवीचा ज्यूस पिण्याचे फायदे.
नोएडाच्या डाएट क्लिनिकच्या  वरिष्ठ आहारतज्ञ अमृता मिश्रा सांगतात की, ‘किवी फळात फायबर, लिपिड्स, व्हिटॅमिन्स, प्रोटिन्स, मिनरल्स, कार्बोहायड्रेट्स, अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी अशी विविध पोषक तत्वं भरपूर प्रमाणात आढळून येतात. याशिवाय किवीच्या दाहक-विरोधी गुणधर्मांमुळे संधीवात किंवा हिवाळ्यात उद्भवणाऱ्या सांधेदुखीच्या त्रासापासून आराम मिळू शकतो. किवी खाल्ल्याने शरीराच्या पेशींची झालेली झीज भरून येते. त्यामुळे कमकुवत पेशींना  ताकद मिळून त्या मजबूत व्हायला मदत होते. एखादी जखम भरायला वेळ लागत असेल तर किवीच्या सेवनामुळे ती जखम लवकर भरायला मदत होते.’ किवी हे फळ वर्षभर जरी मिळत असलं तरीही हिवाळ्यात हे फळ प्रकर्षाने खाण्याचा सल्ला त्या देतात.
advertisement
Kiwi fruit Benefits: विविध आजारांवर गुणकारी आहे किवी, हिवाळ्यात होतील अनेक फायदे

रोगप्रतिकारशक्ती वाढते:

आहारतज्ञ अमृता सांगतात की, किवी अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे किवी खाल्ल्याने किंवा किवीचा ज्यूसमध्ये प्यायल्याने रोगप्रतिकारशक्ती वाढयाला मदत होते. त्यामुळे हिवाळ्यात सर्दी, खोकल्या सारख्या संभाव्या आजारांना दूर ठेवता येतं.
advertisement
किवीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आढळून येतं. जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगलं आहे. किवीमध्ये ल्युटीन आणि झेक्सॅन्थिन मुबलक प्रमाणात मिळते. ज्यामुळे रेटीनाचं आरोग्य सुधारून दृष्टीदोष कमी व्हायला मदत होते.

पोटासाठी गुणकारी :

किवीमध्ये फायबर्स आणि अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अन्न पचायला मदत होऊन अपचनाचा त्रास दूर होतो. त्यामुळे ज्यांना पोटाशी संबंधित समस्या असतील त्यांनी किवी खाणं हे फायद्याचं ठरू शकतं.
advertisement

वजन कमी होतं:

किवीत असलेल्या फायबर्समुळे भूक लागत नाहीत. त्यामुळे अतिरिक्त कॅलरीज पोटात जात नाहीत. याशिवाय, किवीच्या अँटी-इंफ्लेमेटरी, अँटी-हायपरटेन्सिव्ह आणि अँटीऑक्सिडंट गुणधर्म लठ्ठपणावर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे लठ्ठपणा घालवण्यासाठी आणि वजन नियंत्रित ठेवण्यासाठी किवी खाणं फायद्याचं ठरतं.
advertisement

हृदयाचं आरोग्य सुधारतं:

किवीच्या रसामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते. त्यामुळे रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. ज्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारून विविध हृदयविकारांचा धोका टाळता येतो.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Kiwi fruit Benefits: अनेक आजारांवर गुणकारी आहे किवी, हिवाळ्यात खाल्ल्याने होतील ‘इतके’ फायदे, जवळही येणार नाहीत आजार
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement