Mental Health Apps : नैराश्य-भीती राहील दूर, व्हाल मानसिकदृष्ट्या कणखर! हे 4 ॲप्स करतील मदत..

Last Updated:

भारतात मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे, ज्यात नैराश्य हे प्रमुख आहे. ज्या कुटुंबांमध्ये नैराश्याचा इतिहास आहे किंवा ज्यांना जास्त त्रास दिला जातो, खूप चिडवलं जातं त्या लोकांना हा धोका जास्त असतो. मात्र काही ॲप्स आहेत, जे मानसिक आरोग्य सुधारण्यात आपली मदत करू शकतात.

हे मोबाइल ॲप्स मानसिक आरोग्य सुधारण्यास करू शकतात मदत..
हे मोबाइल ॲप्स मानसिक आरोग्य सुधारण्यास करू शकतात मदत..
मुंबई : आजकाल मानसिक आरोग्याच्या समस्या वाढताना दिसत आहेत, विशेषतः किशोरवयीन मुलांमध्ये. शैक्षणिक दबाव, सोशल मीडियाचा अतिवापर आणि वाढलेल्या अपेक्षांमुळे ताण आणि चिंता सामान्य झाली आहे. भारतातही मानसिक आजारांचे प्रमाण वाढत आहे, ज्यात नैराश्य हे प्रमुख आहे. ज्या कुटुंबांमध्ये नैराश्याचा इतिहास आहे किंवा ज्यांना जास्त त्रास दिला जातो, खूप चिडवलं जातं त्या लोकांना हा धोका जास्त असतो. मात्र काही ॲप्स आहेत, जे मानसिक आरोग्य सुधारण्यात आपली मदत करू शकतात.
मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी घरात ध्यान आणि माइंडफुलनेस सारखे प्रयोग करणं फायदेशीर ठरू शकतं. या पद्धती भावनिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना भावनिक लवचिकता आणि आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतात. ध्यान आणि माइंडफुलनेस ॲप्स वापरून या सरावाची सुरुवात करता येते. दैनंदिन कामे त्यांचा ताण आणि चिंता कमी करण्यास, झोप सुधारण्यास आणि कमी प्रतिक्रियाशील बनण्यास मदत करतात.
advertisement
हे मोबाइल ॲप्स मानसिक आरोग्य सुधारण्यास करू शकतात मदत..
इव्हॉल्व्ह (Evolve) : ध्यान, माइंडफुलनेस, कृतज्ञता आणि जर्नलसाठी उपयुक्त, मानसिक आरोग्य सुधारण्यात हे ॲप मदत करते.
राउंडग्लास लिव्हिंग (Roundglass Living) : हे ॲप ध्यान, श्वासोच्छ्वास, योग, निरोगी खाणे आणि झोप या गोष्टींद्वारे तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्यात मदत करते.
हेडस्पेस (Headspace) : या ॲपमध्येदेखील ध्यान, माइंडफुलनेस साधने, मानसिक आरोग्य प्रशिक्षण आणि थेरपी मिळते. याने मानसिक आरोग्य सांभाळण्यात मदत मिळते.
advertisement
स्माइलींग माईंड (Smiling Mind) : हे एक मोफत ॲप असून, मानसिक तंदुरुस्ती आणि लवचिकता निर्माण करण्यासाठी माइंडफुलनेस आणि सकारात्मक मानसशास्त्र उपाय या ॲपमध्ये मिळतात. हे ३ वर्षांवरील मुलांसाठी, कुटुंब आणि किशोरांसाठी डिझाइन केलेले आहे.
हे सर्व ॲप्स iOS आणि Android दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहेत. हे ॲप्स मेंदूवरील ताण कमी करण्यास, झोप सुधारण्यास आणि भावनिक व्यवस्थापनास मदत करतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Mental Health Apps : नैराश्य-भीती राहील दूर, व्हाल मानसिकदृष्ट्या कणखर! हे 4 ॲप्स करतील मदत..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement