आज रथसप्तमी, 'ही' एक चूक टाळाच, वर्षभर राहील भरभराट; 'या' खास उपायांनी होतील सर्व अडथळे दूर!
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
आज रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण देशभरात 'रथसप्तमी' साजरी होत आहे. हिंदू पंचांगानुसार, माघ शुद्ध सप्तमीला भगवान सूर्याचा जन्म झाला, म्हणून याला 'आरोग्य सप्तमी' किंवा 'सूर्य जयंती' असेही म्हणतात.
Rath Saptami 2026 : आज रविवार, 25 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण देशभरात 'रथसप्तमी' साजरी होत आहे. हिंदू पंचांगानुसार, माघ शुद्ध सप्तमीला भगवान सूर्याचा जन्म झाला, म्हणून याला 'आरोग्य सप्तमी' किंवा 'सूर्य जयंती' असेही म्हणतात. यंदाची रथसप्तमी रविवारी आल्याने 'भानू सप्तमी'चा अत्यंत शुभ योग जुळून आला आहे. शास्त्रात असे मानले गेले आहे की, आजच्या दिवशी अन्नामध्ये मिठाचा वापर टाळल्याने केवळ धार्मिकच नाही, तर मोठे आरोग्यदायी फायदे वर्षभर मिळतात.
मिठाचा त्याग का करावा?
1. सूर्य आणि शनी यांचे नाते: ज्योतिषशास्त्रात मीठ हे 'शनी' ग्रहाचे प्रतीक मानले जाते. सूर्य आणि शनी यांच्यात पौराणिक शत्रुत्व आहे. सूर्याच्या जन्मोत्सवाच्या दिवशी त्याचा शत्रू मानल्या जाणाऱ्या शनीचा त्याग करून आपण सूर्याप्रती आपली निष्ठा व्यक्त करतो. असे केल्याने कुंडलीतील 'सूर्य दोष' कमी होऊन सूर्याची कृपा प्राप्त होते.
advertisement
2. शरीराची शुद्धी: शास्त्रीय दृष्टिकोनातून, मीठ शरीरात पाणी धरून ठेवते. रथसप्तमीपासून उन्हाची तीव्रता वाढू लागते. या दिवशी मिठाचा त्याग केल्याने शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. ज्यांना रक्तदाब किंवा हृदयाचे विकार आहेत, त्यांच्यासाठी हा 'एक दिवसाचा मिठाचा त्याग' वर्षभरासाठी शरीर शुद्धीचा पाया ठरतो.
रथसप्तमीला कराल 'ही' काम तर बिघडलेले काम सुधरेल
1. अलोणा नैवेद्य: आजच्या दिवशी अन्नामध्ये मिठाचा वापर करू नका. शक्य असल्यास केवळ दूध, गूळ आणि तांदूळ यांचा वापर करून बनवलेली खीर खावी. असे केल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते आणि अडकलेली आर्थिक कामे मार्गी लागतात.
advertisement
2. सूर्याला अर्घ्य देण्याची योग्य पद्धत: तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात लाल फूल, कुंकू आणि थोडे गहू टाकावेत. सूर्याकडे पाहत "ॐ घृणि सूर्याय नमः" या मंत्राचा उच्चार करत पाणी सोडावे. यामुळे नोकरीतील अडचणी दूर होतात आणि समाजात मान-सन्मान वाढतो.
3. दूध उतू घालवण्याचा विधी: रथसप्तमीला अंगणात मातीच्या चुलीवर दूध तापवावे आणि ते सूर्याच्या दिशेला उतू जाऊ द्यावे. हे शुभ लक्षण मानले जाते. या दुधाचा प्रसाद घेतल्याने जुन्या आजारांपासून मुक्ती मिळते.
advertisement
4. रुईच्या पानांचे स्नान: आज सकाळी अंघोळ करताना डोक्यावर आणि खांद्यावर रुईची पाने ठेवून स्नान करावे. यामुळे मानसिक तणाव कमी होतो आणि शरीरात नवीन ऊर्जेचा संचार होतो.
5. दानधर्माचे महत्त्व: आजच्या दिवशी गरजूंना गूळ, गहू, तांब्याची भांडी किंवा लाल रंगाचे वस्त्र दान करावे. जर तुमचे एखादे कायदेशीर काम अडकले असेल, तर आज केलेले दान त्यातील अडथळे दूर करण्यास मदत करते.
advertisement
या नियमांचे पालन करा
रथसप्तमी हे प्रकाशाचे प्रतीक आहे. सूर्य हा जगाचा आत्मा आहे. मिठाचा त्याग करून आपण आपली 'सात्त्विक ऊर्जा' वाढवतो. जो व्यक्ती आजच्या दिवशी मनोभावे सूर्याची उपासना करतो, त्याच्या जीवनातील अंधार दूर होऊन यशाचा प्रकाश पसरतो. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 25, 2026 1:13 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
आज रथसप्तमी, 'ही' एक चूक टाळाच, वर्षभर राहील भरभराट; 'या' खास उपायांनी होतील सर्व अडथळे दूर!









