दगडी जातं, पाटा वरवंट्यावरील चवीला तोड नाही, मुंबईत कुठे मिळतील या वस्तू पाहा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
रोजच्या दिवशी वापरात येणाऱ्या वस्तू म्हणजे दगडी जातं, पाटा वरवंटा, खलबत्ता या आहेत. या वस्तू मुंबईत तुम्हाला कुठे मिळतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
मुंबई, 29 ऑगस्ट : सध्याच्या आधुनिक उपकरणां व्यतिरिक्त प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या पारंपारिक वस्तूंना प्राधान्य देणारा वर्ग आजही पाहिला मिळतो. गावा खेड्यातच नव्हे तर या पारंपारिक जेवण बनवण्यासाठी लागणाऱ्या वस्तू शहरी नागरिक देखील वापरतात. त्यात सर्वसामान्य रोजच्या दिवशी वापरात येणाऱ्या वस्तू म्हणजे दगडी दगडी जातं, पाटा वरवंटा, खलबत्ता या आहेत. या वस्तू मुंबईत तुम्हाला कुठे मिळतील याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कुठे मिळतील वस्तू?
दादरच्या नक्षत्र मॉल परिसरात असलेल्या अर्थस सोल या दुकानात प्राचीन काळात वापरल्या जाणाऱ्या गृह उपयोगी वस्तू मिळतात. या दुकानाचे मालक योगेश चव्हाण सुरुवातीच्या काळात दादर स्टेशन जवळ देवाच्या पूजेचे सामान आणि मूर्ती विकत होते. ग्राहकांची मागणी लक्षात घेता त्यांनी या ठिकाणी दगडी दिवे, दगडी जातं, दगडी पाटा वरवंटा, खलबत्ता विकण्यास सुरू केले.
advertisement
काय आहे किंमत?
देवांच्या पूजेसाठी लागणारे विशेष दगडी दिवे या ठिकाणी 250 रुपयांना उपलब्ध आहेत. दगडी खलबत्ता येथे 500 रुपयांना मिळेल. बाकी वस्तूंची किंमत 250 रुपयांच्या पुढे आहे. दगडी वस्तूच नव्हे तर या ठिकाणी कॉपरच्या कळशी देखील मिळतात. या कळशांमध्ये कल्हई केली गेली आहे. ज्यामुळे या कळशीमध्ये अगदी जेवण देखील शिजवता येते आणि जेवण त्यात काळपटनार ही नाही.
advertisement
गौरीच्या सजावटीमध्ये मुंबईत ‘या’ सिनेमाचा ट्रेन्ड, 300 रुपयांमध्ये ‘इथं’ घ्या सुंदर मुखवटे
काळाप्रमाणे लुप्त झालेल्या या गृह उद्योग वस्तूंना आजही मागणी आहे. अशा जुन्या वस्तूंचे महत्त्व जपणाऱ्या माणसांसाठी दादरच्या या परिसरात दगडी वस्तू उपलब्ध आहेत, अशी माहिती येथील मालक योगेश चव्हाण यांनी दिली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2023 5:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
दगडी जातं, पाटा वरवंट्यावरील चवीला तोड नाही, मुंबईत कुठे मिळतील या वस्तू पाहा Video