ऐकावं ते नवलंच! आता आली मेहुणीसाठी राखी, पण भाभी राखी बांधायची कुठं?

Last Updated:

रक्षाबंधन हा भावा-बहिणीचा सण मानला जातो. पण आता मेहुणीसाठी राखी आलीय. पाहा काय आहे ट्रेंड?

+
ऐकावं

ऐकावं ते नवलंच! आता आली मेहुणीसाठी राखी, पण भाभी राखी बांधायची कुठं?

ठाणे, 29 ऑगस्ट: रक्षाबंधन हा सण भावा-बहिणीच्या नात्याचं अनोखं बंधन मानला जातो. हा सण उद्यावर आल्याने रंगबेरंगी व अनोख्या राखींनी बाजार गजबजले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही बाजारात राखींचा नवा ट्रेंड दिसतोय. सध्या लुंबा राखीचा ट्रेंड आहे. ही राखी खासकरून वहिनीसाठी आणि मेहुणीसाठी बनवली आहे. ज्याला भाभी राखी असं देखील म्हटलं जातं. ठाण्यातील अशाच एका राखीच्या स्टॉलवर ही राखी उपलब्ध आहे.
लुंबा राखीचे वैशिष्ट्य
रक्षाबंधन हा सण बहीण भावासोबतच इतर नात्यांमध्ये देखील साजरा केला जातो. या दिवशी मेहुणी, वहिणी किंवा बहिणीच्या पतीलाही राखी बांधली जाते. लुंबा राखी ही त्यासाठीच बनवली असून तिला भाबी राखी असेही म्हणतात. या विशिष्ट राखी मध्ये सजावटीच्या धाग्याचा समावेश असतो. ज्यामध्ये मणी व धाग्यांची नक्षी एखाद्या लटकन प्रमाणे केली जाते. ही लुंबा राखी महिलांसाठी बनलेली आहे. हाताच्या मनगटा ऐवजी वहिनीच्या बांगडीभोवती बांधण्यासाठी ह्या राख्या बनवल्या गेल्या आहे. लुंबा राखी मधील संकल्पना म्हणजेच वहिनीमधील बंध घट्ट करणे व कुटुंबातील एकता वाढवणे.
advertisement
कुठं मिळतेय ही राखी?
ठाण्याचा कळवा परिसरात असलेले पटवा राखीवाला दुकान गेल्या अनेक वर्षांपासून विविध राख्यांचे विक्रेते आहेत. या दुकानाचे व्यवस्थापक राहुल पटवा व त्यांची आई प्रभा पटवा या दुकानाचे व्यवहार सांभाळतात. या दुकानात लुंबा राखी बरोबरच कुंदनची फॅन्सी राखी, मोत्यांची राखी, रुद्राक्षाची राखी, लहान मुलांसाठी म्युझिकल राखी, कार्टूनची राखी, देवाला बांधण्यासाठी गोंड्याची राखी, राम राखी इत्यादी राख्या या ठिकाणी अगदी तीन रुपयांपासून मिळतात.
advertisement
ट्रेंडी राखी आणि किंमत
या दुकानात देवाला बांधण्यासाठी गोंड्याच्या राख्या उपलब्ध आहेत. त्या तीन रुपयांपासून वेगवेगळ्या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहेत. फॅन्सी खड्यांचे वर्क असलेल्या राख्या या ठिकाणी 20 रुपयांपासून 80 रुपयांपर्यंत मिळतील. लहान मुलांच्या वेगवेगळ्या कार्टून प्रिंटमध्ये असलेल्या राख्या या ठिकाणी मिळतात. युनिक राख्यांचं कलेक्शन येथे पाहायला मिळतं. तसेच म्युझिकल राखीही अनेकांना आकर्षित करतेय. यंदाच्या रक्षाबंधनला ठाण्याच्या कळवा परिसरात पॉकेट फ्रेंडली किमतीत राख्या उपलब्ध आहेत, अशी माहिती या राखी विक्रेते राहुल पटवा यांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
ऐकावं ते नवलंच! आता आली मेहुणीसाठी राखी, पण भाभी राखी बांधायची कुठं?
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement