रक्षाबंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? ज्योतिषांनी दिली महत्त्वाची माहिती
- Published by:News18 Marathi
- local18
Last Updated:
Raksha Bandhan 2023 : रक्षा बंधनाचा शुभ मुहूर्त कोणता? राखी बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात? जाणून घ्या..
advertisement
राखी नेमकी 30 तारखेला बांधायची की 31 तारखेला असा प्रश्न अनेकांना पडला आहे. रक्षाबंधनाच्या पवित्र क्षणाचा शुभ मुहूर्त काय आहे? भावाला राखी बांधताना कोणत्या चुका टाळाव्यात? याबाबत <a href="https://news18marathi.com/maharashtra/wardha/">वर्धा</a> येथील ज्योतिष अभ्यासक पद्माकर पेठकर यांच्याकडून जाणून घेणार आहोत.
advertisement
यावर्षी 30 तारखेला सकाळी दहा ते ते रात्री नऊ वाजेपर्यंत भद्रा नक्षत्राचा काळ असल्याचं सांगितलं जातं. त्यामुळे या काळामध्ये राखी बांधणं अशुभ मानलं जातं. त्यामागंही काही कारण गुरुजी सांगतात. 31 तारखेला सकाळी 5 : 45 वाजलेपासून ते सकाळी 7 वाजेपर्यंत आपण हा सण साजरा करू शकतो. म्हणजे तुम्ही भावाला राखी बांधू शकता, असे पेठकर गुरुजी सांगतात.
advertisement
advertisement
advertisement
advertisement


