गौरीच्या सजावटीमध्ये मुंबईत ‘या’ सिनेमाचा ट्रेन्ड, 300 रुपयांमध्ये ‘इथं’ घ्या सुंदर मुखवटे
- Published by:News18 Marathi
Last Updated:
गौरी- गणपतीच्या आगमनाला आता काही दिवसच उरले आहेत. यासाठी लागणाऱ्या सजावटींच्या वस्तूंनी मुंबईची बाजारपेठ सजलीय.
मुंबई, 29 ऑगस्ट : गौरी- गणपतीच्या आगमनाला आता काही दिवसच उरले आहेत. यासाठी लागणाऱ्या सजावटींच्या वस्तूंनी मुंबईची बाजारपेठ सजलीय. गौरीचे मुखवटे,दागिने, रेडिमेड साड्या यांच्या खरेदीसाठी महिलावर्गाची लगबग सुरू झालीय. या वर्षी सुपरहिट ठरलेल्या ‘बाई पण भारी देवा’ या सिनेमाचा ट्रेंड गौरीच्या सजावटीमध्येही दिसतोय.
मुंबईच्या लालबाग परिसरात असलेल्या दिगंबर आर्ट्स या दुकानात बाई पण भारी देवांमध्ये घातलेल्या कलाकारांनी साड्या आणि दागिन्यांनी गौरी सजवण्यात आली आहे. हा सिनेमा महिलावर्गामध्ये चांगलाच लोकप्रिय झाला होता. त्याचेच प्रतिबिंब गौरीच्या सजावटीमध्येही उमटलंय.
advertisement
गौरीचे वेगवेगळे मुखवटे देखील या बाजारात उपलब्ध असून त्याची किंमत 300 रुपयांपासून सुरू आहे. अमरावती पॅटर्न, सोलापुरी पॅटर्न, कोल्हापुरी पॅटर्न, गजरा, आंबडा, असे वेगवेगळ्या प्रकारचे मुखवटे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर पीओपी, फायबर, कापडी, लाकडी गौरीचे शरीर देखील आहेत. गौरीसाठी लागणारे दागिने यामध्ये मंगळसूत्र, कानातले, ठुशी, पैजण, गजरा, नथ, कंबरपट्टा, अशी आभूषण देखील दोनशे रुपयांपासून या ठिकाणी उपलब्ध आहेत.
advertisement
‘यंदा ग्राहकांचा प्रतिसाद चांगला आहे. बाई पण भारी देवा या चित्रपटातील कलाकारांनी घातलेल्या साडी, दागिने हे आम्ही गौरीसाठी उपलब्ध करून दिले असून ग्राहकांची याला मोठी पसंती मिळतीय. हा संपूर्ण सेट आठ हजार रुपयांपासून असून तुम्हाला हव्या त्या पद्धतीनं याच्या किंमतीमध्ये बदल होतो, अशी माहिती दिगंबर आर्ट्सचे मालक सागर कसाबे यांनी दिली.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 29, 2023 10:18 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
गौरीच्या सजावटीमध्ये मुंबईत ‘या’ सिनेमाचा ट्रेन्ड, 300 रुपयांमध्ये ‘इथं’ घ्या सुंदर मुखवटे