Poha Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा, सगळे पुन्हा पुन्हा मागतील
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
Poha Recipe: नाश्त्याला रोज रोज पोहे खाण्याचा कंटाळा आल्यावर पोह्यांची वेगळी रेसिपी ट्राय करू शकता. पुण्यातील गृहिणीने एक खास रेसिपी सांगितली आहे.
पुणे : दररोज नाश्त्याला काय बनवायचं? हा प्रश्न अनेक गृहिणींना पडतो. कारण सगळ्यांनाच रोज काहीतरी नवीन आणि चविष्ट खायला हवं असतं. नाश्ता म्हटलं की घरोघरी कांदापोहे, शिरा अन् उपीट ठरलेलं असतं. रोज रोज कांदापोहे खाऊन कंटाळा येतो. तेव्हा पोह्याची एक वेगळी रेसिपी ट्राय करू शकता. याबाबत पुण्यातील गृहिणी वसुंधरा यांच्याकडून जाणून घेऊ.
दडपे पोहे बनवण्यासाठी साहित्य
दडपे पोहे बनवण्यासाठी अगदी घरातीलच साहित्य लागते. पातळ पोहे, साखर, दूध, तेल, मोहरी, जिरे कढीपत्ता, हिरवी मिरची, हिंग, हळद, शेंगदाणे, कांदा, खोवलेला नारळ, कोथिंबीर, लिंबू आणि चवीनुसार मीठ.
पोहे बनवण्याची कृती
दडपे पोहे बनवण्यासाठी पातळ पोहे घ्या. पोहे स्वच्छ निवडून, त्यात साखर, मीठ, ओलं खोबरे, दूध आणि थोडा बारीक चिरलेला कांदा घालून हलक्या हाताने मिक्स करा आणि अर्धा तास भिजत ठेवा. दरम्यान कढईत तेल गरम करून शेंगदाणे तळा व बाजूला ठेवा. त्याच तेलात मोहरी, जीरे, कढीपत्ता, हिरवी मिरची, कांदा, हळद आणि हिंग घालून फोडणी तयार करा.
advertisement
फोडणी थोडी गार झाल्यावर लिंबूरस घालून ही फोडणी भिजवलेल्या पोह्यावर टाका आणि मिक्स करा. शेवटी कोथिंबीर, ओलं खोबरे आणि शेव घाला. अशा प्रकारे स्वादिष्ट दडपे पोहे खाण्यासाठी तयार होतात. ही रेसिपी रोजचा कांदेपोह्यांचा कंटाळा आल्यावर बनवू शकता. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण आवडीने खातील, असं वसुंधरा सांगतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
November 09, 2025 11:35 AM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Poha Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा, सगळे पुन्हा पुन्हा मागतील

