Health Tips : हिवाळ्यात गरम जेवणात नक्की टाका 1 चमचा तूप, शरिरासाठी आहे एक नंबर!
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
गरम जेवणात 1 ते 2 चमचे तूप आहारात घेतल्यास अनेक फायदे आहेत. गरम जेवणात तूप खाण्याचे महत्त्वाचे फायदे कोणते? चला तर जाणून घेऊ.
अमरावती : सद्यस्थितीमध्ये अनेकांच्या आहारातून तूप कालबाह्य झाले आहे. कारण तूप आहारात घेतल्यास वजन वाढणे, कोलेस्टेरॉल वाढणे, हृदयविकाराचा धोका, पचनावर परिणाम यांसारख्या समस्या निर्माण होतात. पण, तूप जर योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात आहारात घेतले तर त्याचे अनेक फायदे आहेत. अगदी केसांपासून ते हाडे मजबूत होण्यापर्यंत तूप खाण्याचे फायदे होतात. गरम जेवणात 1 ते 2 चमचे तूप आहारात घेतल्यास अनेक फायदे आहेत. गरम जेवणात तूप खाण्याचे महत्त्वाचे फायदे कोणते? चला तर जाणून घेऊ.
गरम जेवणात तूप खाण्याचे महत्त्व काय आहे?
गरम भात, पोळी किंवा वरणावर थोडं तूप घालून खाल्ल्यास शरीराला ऊर्जा मिळते तसेच पचन सुधारते. गरम अन्नावर तूप मिसळल्याने त्यातील पोषक घटक शरीराला अधिक प्रभावीपणे मिळतात.
मेथीचे लाडू' खा, हिवाळ्यात सांधेदुखीला म्हणा कायमचे गुडबाय ! डॉक्टरांनी सांगितले 'हे' ४ अद्भुत फायदे
गरम जेवणात तूप खाण्याचे आरोग्यदायी फायदे
गरम जेवणात तूप घेतल्यास पचन सुधारण्यास मदत होते. तूप पाचक रसांना चालना देते. त्यामुळे गरम अन्नावर तूप घेतल्यास अन्न सहज पचते. तसेच त्वचा आणि केसांना पोषण मिळते. तुपातील फॅटी ॲसिडमुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि कोरडेपणा कमी होण्यास मदत होते.
advertisement
त्याचबरोबर तुपातील ओमेगा-3 फॅटी ॲसिड मेंदूची कार्यक्षमता वाढविण्यासाठी मदत करते. त्यामुळे एकाग्रता वाढते. गरम जेवणात तूप घेतल्यास शरीरातील उष्णता नियंत्रित राहते. हिवाळ्यात गरम अन्नावर तूप खाल्ल्याने शरीराला आवश्यक उष्णता मिळते आणि थंडीपासून संरक्षण मिळते.
नियमित प्रमाणात तूप सेवन केल्यास सांधे लवचिक राहतात आणि वेदना कमी होतात. तसेच तुपात अँटिऑक्सिडंट गुणधर्म असतात, जे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत करतात.
advertisement
गरम जेवणात तूप खाण्याची योग्य पद्धत कोणती?
view commentsजेवणात साधारण एक ते दोन चमचे तूप पुरेसे असते. गरम भात, वरण, पोळी किंवा खिचडीवर तूप घालून खावे. अतिप्रमाणात तूप खाल्ल्यास वजन वाढण्याची शक्यता असल्याने प्रमाण नियंत्रित ठेवावे. आयुर्वेदानुसार तूप हे सात्त्विक अन्न आहे, जे शरीर, मन आणि आत्म्याला संतुलित ठेवते. विशेषतः हिवाळ्यात दररोजच्या गरम जेवणात तुपाचा वापर केल्याने शरीर मजबूत आणि ऊर्जावान राहते.
Location :
Amravati,Maharashtra
First Published :
November 08, 2025 8:01 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
Health Tips : हिवाळ्यात गरम जेवणात नक्की टाका 1 चमचा तूप, शरिरासाठी आहे एक नंबर!

