Diwali Recipe : बेसन लाडू आता चिकटणार नाही तोंडात, बनवताना फक्त टाका हा एक पदार्थ, VIDEO
- Published by:Mohan Najan
- Reported by:Pooja Satyavan Patil
Last Updated:
अनेकदा लाडू चिकट होतात किंवा नीट वळत नाहीत. त्यामुळे योग्य प्रमाण आणि पद्धत माहिती असणं महत्त्वाचं असतं.
पुणे : दिवाळीचा फराळ म्हटलं की लाडू आलेच. या सणात प्रत्येकाच्या घरी बेसन लाडू बनवलेच जातात. पण अनेकदा लाडू चिकट होतात किंवा नीट वळत नाहीत. त्यामुळे योग्य प्रमाण आणि पद्धत माहिती असणं महत्त्वाचं असतं.आज आपण पाहणार आहोत बेसन लाडू अगदी परफेक्ट आणि न चिकटणारे कसे बनवायचे.
बेसन लाडू साहित्य
बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बेसन, साखरेची पावडर, तूप, वेलची पावडर आणि मनुके. तुम्हाला जितके बेसन लाडू बनवायचे आहेत, त्यानुसार या सर्व साहित्याचं प्रमाण घ्या.
बेसन लाडू बनवण्याची कृती
बेसन लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून घ्यावी. त्यात तूप टाकून वितळू द्यावे. तूप पूर्णपणे वितळल्यावर थोडंथोडं करून बेसन कढईत घालून सतत हलवत भाजावे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी आणि साधारण 10 मिनिटांनी फ्लेम मंद करावी. उरलेले तूप घालून बेसन 20–25 मिनिटे परतत भाजावे. बेसन हलकं सोनेरी रंगाचा आणि सुवासिक झाल्यावर गॅस बंद करावा. भाजलेलं बेसन एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
advertisement
भाजलेलं बेसन पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात पाऊण बाउल साखरेची पावडर आणि पाव टेबलस्पून वेलची पावडर घालावी. सगळं नीट मिक्स करून घ्यावे. नंतर याचे लाडू वळून घ्यावे. अशा प्रकारे मऊ, आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू तयार होतात.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
October 18, 2025 6:47 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
Diwali Recipe : बेसन लाडू आता चिकटणार नाही तोंडात, बनवताना फक्त टाका हा एक पदार्थ, VIDEO