Ice Tea Recipe : उन्हाळ्यात बनवा ऑरेंज फ्लेवरची आईस टी, घरच्या साहित्यापासून बनेल झटपट, रेसिपीचा video

Last Updated:

उन्हाळा असल्यामुळे सध्याला बाहेर कडाक्याचे ऊन पडत आहे. अशा कडाक्याच्या उन्हामध्ये आपण जर गरम चहा घेतला तर त्यामुळे अजूनच गर्मी वाढते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी झटपट असा ऑरेंज फ्लेवरची आईस टी करू शकता.

+
घरीच

घरीच तयार करा ऑरेंज फ्लेवरची आईस टी

 छत्रपती संभाजीनगर :  आपल्यापैकी बरेच जण हे चहा प्रेमी आहेत. उन्हाळा असल्यामुळे सध्याला बाहेर कडाक्याचे ऊन पडत आहे. अशा कडाक्याच्या उन्हामध्ये आपण जर गरम चहा घेतला तर त्यामुळे अजूनच गर्मी वाढते. त्यासाठी तुम्ही घरच्या घरी झटपट असा ऑरेंज फ्लेवरची आईस टी करू शकता. ही रेसिपी घरच्या साहित्यापासून कशी करायची? याची रेसिपी आपल्याला मेघना देशपांडे यांनी सांगितलेली आहे.
आईस टीसाठी लागणारे साहित्य
चहा पावडर ( तुम्ही घरात जी चहा पावडर वापरता ती वापरली तरी चालेल ), ऑरेंज सरबत प्रिमिक्स किंवा या ऐवजी तुम्ही ग्लुकॉन डी किंवा ग्लुकॉन सीचा वापर देखील करू शकता. चहा पावडर ऐवजी बाजारात ज्या टी बॅग भेटतात त्याही तुम्ही वापरू शकता.
advertisement
आईस टी बनवण्याची कृती
सर्वप्रथम एका भांड्यामध्ये 200 एम एल कडक उकळत पाणी घ्यायचं. त्या पाण्यामध्ये पाव चमचा चहा पत्ती टाकायची आणि ते पाणी तसंच पाच ते दहा मिनिटं झाकण ठेवून बाजूला ठेवायचं. दहा मिनिटानंतर चहा पत्ती पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स होऊन जाईल. त्यानंतर ते चहा पत्ती टाकलेले पाणी एका कपमध्ये गाळून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये दोन चमचे ऑरेंज सरबत प्रिमिक्स टाकायचा ते चांगलं मिक्स करून घ्यायचं. आपण यामध्ये साखर यामुळे नाही टाकली की या प्रिमिक्समध्ये आधीच साखर असतं त्यामुळे यात आपण साखर नाही टाकली. तुम्हाला हवा तेवढा प्रमाणात त्यामध्ये तुम्ही बर्फ टाकावा. अशा सोप्या पद्धतीने हा आईस टी तयार होतो.
advertisement
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Ice Tea Recipe : उन्हाळ्यात बनवा ऑरेंज फ्लेवरची आईस टी, घरच्या साहित्यापासून बनेल झटपट, रेसिपीचा video
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement