बिना तुपाचे रव्याचे पांढरेशुभ्र लाडू, या पद्धतीनं बनतील झटपट, Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
रव्याचे लाडू अनेकांना खायला आवडतात. त्यामुळे रव्याचे नव्या पद्धतीचे लाडू कसे बनवायचे? याचीच माहिती वर्धा येथील गृहिणी समीक्षा चव्हाण यांनी दिली आहे.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा : रव्याचे लाडू अनेकांना खायला आवडतात. आता पर्यंत तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे रव्याचे लाडू खाल्ले असतील. मात्र, कधी रवा न भाजता, तुपाशिवाय आणि पाका शिवाय लाडू खाल्ले आहेत का? हे लाडू इतर लाडू पेक्षा झटपट तयार होतात आणि कोणीही सहज बनवू शकतं. रव्याचे नव्या पद्धतीचे लाडू कसे बनवायचे? याचीच माहिती वर्धा येथील गृहिणी समीक्षा चव्हाण यांनी दिली आहे.
advertisement
रव्याचे लाडू बनवण्यासाठी साहित्य
2 ग्लास कच्चा रवा, 2 ग्लास पिठीसाखर, 2 ग्लास खोबराकीस, सुकामेवा आणि थोडं दूध हे साहित्य लागेल.
रव्याचे लाडू बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम कुकरमध्ये 2 तांबे पाणी घालायचं. कच्चा रवा एका उभ्या आकाराच्या डब्ब्यात भरून कुकरमध्ये पाण्यात ठेवायचा. डब्ब्यात पाणी जाणार नाही याची काळजी घ्यावी. आणि कुकरचं झाकण लावून 15 शिट्ट्या येऊ द्या. त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर एका परातीत रवा काढून घ्या.
advertisement
शेवग्याच्या शेंगांची अशा प्रकारे बनवा चविष्ट कढी; एकदम आवडीने खाल Video
रवा पूर्ण मोकळा करून घ्या त्यात खोबराकीस आणि पिठीसाखर आणि ड्रायफ्रूट अॅड करून चांगलं एकत्र करून घ्या. आता अगदी थोडंस दूध अॅड करून लाडू बांधल्या जातील इतकं मिश्रण तयार झाल्यावर हाताने लाडू वळून घ्या.अशाप्रकारे चविष्ट आणि पांढरेशुभ्र लाडू खाण्यासाठी तयार आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
April 24, 2024 12:02 PM IST