कडधान्य खाण्याचा कंटाळा येतोय? मग सोप्या पद्धतीनं बनवा कडधान्याचे थालीपीठ, रेसिपी पाहाच Video
- Published by:News18 Marathi
- Reported by:Amita B Shinde
Last Updated:
कडधान्य खाण्यासाठी अनेक जण कंटाळा करतात. यावर उत्तम पर्याय म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचे थालीपीठ होय.
अमिता शिंदे, प्रतिनधी
वर्धा : मोड आलेली कडधान्य खाण्याचे आपल्या शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र, ही कडधान्य खाण्यासाठी अनेक जण कंटाळा करतात. यावर उत्तम पर्याय म्हणजे मोड आलेल्या कडधान्याचे थालीपीठ होय. हे थालीपीठ बनवण्याची रेसिपी अगदी सोपी आहे. कोणी सहज बनवू शकेल. त्यामुळे वर्धा येथील गृहिणी कल्पना बनसोड यांनी या रेसिपीबद्दल माहिती दिली आहे.
advertisement
थालीपीठ बनवण्यासाठी साहित्य
मोड आलेली मटकी, मोड आलेली मुग, मोड आलेले चणे, 1 मोठी वाटी रवा, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार तिखट, मीठ, हळद, धणेपूड, कढीपत्ता, हिरवी, मिरची हे साहित्य लागेल.
थालीपीठ बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम मोड आलेले मटकी, चणे, मुग, मिरची, कढीपत्ता आणि मीठ मिक्सरमधून बारीक करून घ्या. खूप जास्त बारीक पेस्ट नाही करायची. आता यामध्ये रवा अॅड करून चांगलं एकत्र करून घेऊया आणि 10 मिनिटे झाकून ठेवायाच. 10 मिनिटे झाल्यानंतर त्यात मीठ, तिखट, धणेपूड, हळद, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर अॅड करून चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. आता गॅसवर तवा गरम करण्यासाठी ठेवूया. याठिकाणी तवा नॉनस्टिक नाही वापरला तरी चालेल. साधा लोखंडी तवाच वापरचा आहे. या तव्यावर थोडं तेल लावून हे मिश्रण पसरवून घ्यायचं आहे. दोन्ही बाजूने थालीपीठ चांगलं शिजल्यानंतर गरमागरम सर्व्ह करायचं आहे. आता तुमच्या आवडत्या चटणीबरोबर खाता येईल किंवा गोड दह्या सोबत खाल्ले तरी चालेल, असं कल्पना बनसोड सांगतात.
Location :
Wardha,Wardha,Maharashtra
First Published :
April 18, 2024 11:44 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
कडधान्य खाण्याचा कंटाळा येतोय? मग सोप्या पद्धतीनं बनवा कडधान्याचे थालीपीठ, रेसिपी पाहाच Video