महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ, पारंपरिक सांज्याची पोळी, रेसिपीचा Video
- Reported by:Pooja Satyavan Patil
- Published by:Mohan Najan
Last Updated:
रव्यापासून बनवला जाणारा गोड प्रकार आणि त्याच सांज्याचे सारण भरून तयार केली जाणारी ही पोळी म्हणजे सांज्याची पोळी होय. ही पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी प्रिती शिवशरण यांनी खास पद्धतीने बनवून दाखवली आहे.
पुणे: महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही विविध पारंपरिक पदार्थांनी समृद्ध आहे. त्यापैकी एक खास आणि घराघरात बनवला जाणारा पदार्थ म्हणजे सांज्याची पोळी. हा पदार्थ केवळ चविष्टच नाही, तर ऐतिहासिक परंपरेशीही जोडलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळात सांजा आणि त्यापासून बनवली जाणारी सांज्याची पोळी मोठ्या प्रमाणात तयार केली जात असल्याचे सांगितले जाते. सांजा म्हणजे रव्यापासून बनवला जाणारा गोड प्रकार आणि त्याच सांज्याचे सारण भरून तयार केली जाणारी ही पोळी म्हणजे सांज्याची पोळी होय. ही पारंपरिक आणि चविष्ट रेसिपी प्रिती शिवशरण यांनी खास पद्धतीने बनवून दाखवली आहे.
सांज्याची पोळी बनवण्यासाठी साहित्य
रवा, गूळ, वेलची, जायफळ, सुंठ पावडर, केशर बदामाचे काप, तूप, गव्हाचे पीठ, तेल आणि चवीनुसार मीठ हे साहित्य लागेल.
सांज्याची पोळी कृती
सुरुवातीला गव्हाच्या पिठात चिमूटभर मीठ आणि एक चमचा तेल घालून आवश्यकतेनुसार पाणी टाकत मऊ कणिक मळून घ्या. ही कणिक 15 ते 20 मिनिटे झाकून ठेवावी. दरम्यान, कढईत दीड वाटी पाणी उकळायला ठेवा. पाणी उकळू लागल्यानंतर त्यात गूळ घालून तो पूर्णपणे विरघळू द्या. त्यानंतर हळूहळू रवा घालत सतत हलवत राहा, जेणेकरून गाठी होणार नाहीत. त्यात वेलची, जायफळ आणि सुंठ पावडर तसेच केशर पाणी घालून मिश्रण एकजीव करा. झाकण ठेवून काही मिनिटे वाफ येऊ द्या.
advertisement
सांजा तयार झाल्यानंतर तो थोडा थंड होऊ द्या आणि त्यात बदामाचे काप मिसळा. यानंतर सांजाचे आणि कणकेचे छोटे गोळे तयार करा. कणकेचा गोळा हलक्या हाताने लाटून त्यामध्ये सांजाचा गोळा भरावा आणि सावकाश पोळी लाटावी. गरम तव्यावर तूप घालून पोळी दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजावी. पोळी छान फुगल्यावर वरून थोडे केशर आणि साजूक तूप घालावे. अशा प्रकारे पारंपरिक आणि चविष्ट सांज्याची पोळी तयार होते.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 20, 2026 3:30 PM IST
मराठी बातम्या/रेसिपी/
महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील खास पदार्थ, पारंपरिक सांज्याची पोळी, रेसिपीचा Video







