विदर्भ स्टाईल गोळा भात कसा बनवाल? बघा घरगुती सोप्पी पद्धत, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
विदर्भ स्टाईल गोळा भात कसा बनवाल?बघा घरगुती सोप्पी पद्धत
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: महाराष्ट्रात वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या खाद्यपद्धती प्रसिद्ध आहेत. विदर्भ परिसर हा चमचमीत खाण्यासाठी प्रसिद्ध आहे. येथील 'गोळा भात’ हा अस्सल वऱ्हाडी पदार्थ संपूर्ण देशात फेमस आहे. स्वयंपाक घरात सहज उपलब्ध असलेल्या वस्तूंपासून विदर्भ स्टाईल गोळाभात तयार होतो. हा गोळा भात कसा तयार होतो? याची रेसिपी वर्धा येथील साधना पवार यांनी सांगितली आहे.
advertisement
गोळा भात साठी लागणारे साहित्य
1 वाटी चण्याची डाळ, 1 वाटी तूर डाळ, 1 ग्लास तांदूळ, 2 हिरव्या मिरच्या, लसूण पाकळ्या, कोथिंबीर, कढीपत्ता, मेथीची तोडलेली भाजी, वाटीभर वाटाणे, तिखट, मीठ, हळद, मसाला, जिरेपूड, धणेपूड, तेल, हे साहित्य लागेल.
गोळा भात बनविण्यासाठी रेसिपी
सर्वप्रथम चना डाळ आणि तूर डाळ 2 तास भिजत घालून भिजल्यानंतर मिक्सर मधून जाडसार काढून घ्यायचं आहे. बारीक करताना त्यात थोडे वाटाणे, लसूण, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मेथीची भाजी टाकायची आहे. त्यानंतर त्यात तिखट मीठ, हळद हे मसाले घालून हे सारण गोळे बनविण्यासाठी तयार आहे. त्याचे हाताने गोळे बनवून घ्यायचे आहेत. आता एका कढईत किंवा गंजात पाणी उकळल्यावर वर चाळणी ठेवून गोळे वाफवून घ्या. तोपर्यंत एका कुकर मध्ये तेल घेऊन जिरे घालून तांदूळ स्वच्छ धुवून घेऊन भात फोडणी द्यायचा आहे.
advertisement
भात शिजेपर्यंत 10- 15 मिनिट झाल्यानंतर गोळेही वाफवून तयार होतील. आता हे गोळे भातावर ठेऊन परत 5 मिनिटे वाफवून घ्यायचे आहेत. जेणेकरून मस्तपैकी सुवास सुटेल. आता विदर्भ स्टाईल गोळा भात खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही हा भात कढी, मठ्ठा, चिंचेची चटणी किंवा आवडत्या चटणीसोबत खाऊ शकता, अशी माहिती वर्धा येथील साधना पवार यांनी दिली.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
January 04, 2024 8:31 AM IST