Makar Sankranti Special: एका तासात बनवा मऊसूत, खुसखुशीत तिळाचे लाडू, सर्वात सोपी रेसिपी!

Last Updated:

Tilache Ladoo Sankrant Special Recipe: यंदा हटके, जरा वेगळे तिळाचे लाडू बनवावे, असा आपला प्रयत्न असेल तर आज आपण अगदी लुसलुशीत, खमंग अशा तिळाच्या लाडूंची रेसिपी पाहणार आहोत. विशेष म्हणजे हे लाडू झटपट होणारे आहेत. त्यामुळे तुम्ही वर्किंग असाल तरी सहज बनवू शकता.

+
तीळगूळ

तीळगूळ घ्या, गोड गोड बोला!

निकिता तिवारी, प्रतिनिधी
मुंबई : मकर संक्रांतीचा सण आता अवघ्या काहीच दिवसांवर आहे. संक्रांत आणि तीळगूळाचे लाडू हे गोड समीकरण आपण वर्षानुवर्षे जपलंय. खरंतर हे लाडू बनवणं वाटतं तेवढं सोपं नसतं कारण त्यात पाकाची तार सतत तपावासी लागते. ती व्यवस्थित जमली की, लाडूही छान होतात. शिवाय ही प्रक्रिया मोठी असते. परंतु काळजी नसावी...
advertisement
यंदा हटके, जरा वेगळे तिळाचे लाडू बनवावे, असा आपला प्रयत्न असेल तर आज आपण अगदी लुसलुशीत, खमंग अशा तिळाच्या लाडूंची रेसिपी पाहणार आहोत. विशेष म्हणजे हे लाडू झटपट होणारे आहेत. त्यामुळे तुम्ही वर्किंग असाल तरी सहज बनवू शकता. साईली तोडणकर यांनी या लाडूंची रेसिपी सांगितली आहे. 
advertisement
तिळाचे लाडू बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
  • पाव किलो चणाडाळ
  • पाव किलो शेंगदाणे
  • अर्धा किलो पांढरे तीळ
  • सेंद्रिय गूळ
  • पारंपरिक पद्धतीचा गूळ
तिळाचे लाडू बनवण्याची कृती :
सर्वात आधी तीळ, डाळ आणि शेंगदाणे वेगवेगळ्या पातेल्यांमध्ये मंद आचेवर ढवळत गरम करून घ्यावे. तिन्ही पदार्थ थंड झाल्यानंतर त्यांचं एकत्र मिश्रण करावं आणि मिक्सरमध्ये वाटून घ्यावं. हे वाटण करताना त्यात चवीनुसार गूळ घालावा. आता गूळ, चणाडाळ, पांढरे तीळ आणि शेंगदाणे चारही पदार्थांचं एकजीव मिश्रण झालं असेल, ते एका ताटात काढून घ्यावं. त्यात वेलची, जायफळ पूड घालून पुन्हा एकजीव करावं. मग त्यात हलकं तूप घालून पारंपरिक पिवळ्या रंगाच्या गुळाचा हलका तयार पाक करून घ्यावा. तो या मिश्रणात मिसळावा.
advertisement
संपूर्ण मिश्रण व्यवस्थित एकत्र करून लाडू वळायला सुरुवात करावी. गुळाचा पाक गरम असतानाच लाडू वळायचे आहेत. अगदी कमी साहित्यात घरच्या घरी अवघ्या एका तासात तयार होणारे हे मऊ लाडू आपण यंदा ट्राय करून सर्वांचं तोंड गोड करू शकता.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Makar Sankranti Special: एका तासात बनवा मऊसूत, खुसखुशीत तिळाचे लाडू, सर्वात सोपी रेसिपी!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement