Sesame seeds - पांढरे तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे, आहारात करा समावेश

Last Updated:

तीळ आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. तीळ खाणं आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतात.

News18
News18
मुंबई : तुम्ही तीळाची चटणी किंवा लाडूचे खाल्ले असतील. मुख्यत्वे थंडीच्या दिवसात तिळाचे पदार्थ का खाल्ले जातात आणि त्यातले घटक आपल्यासाठी कसे महत्त्वाचे आहेत याविषयीची ही माहिती.
तीळ आपल्या आरोग्यासाठी खूपच उपयुक्त आहेत. तीळामध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, कॅल्शियम,
मॅग्नेशियम, व्हिटॅमिन ई आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक पोषक घटक आहेत. तीळ खाणं आपल्या त्वचेसाठी आणि केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकतात. पांढरे तीळ आणि काळे तीळ दोन्हीही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. त्यामुळे येणाऱ्या थंडीत तुमच्या आहारात तिळाचा समावेश नक्की करा.
काळे तीळ पांढऱ्या तिळापेक्षा किंचित जास्त पौष्टिक मानले जातात आणि ते अधिक महाग देखील आहे.
advertisement
काळे तीळ थोडे कडू असतात तर पांढरे तीळ कुरकुरीत आणि गोडसर असतात. त्यामुळे काही पदार्थ वगळता
पांढरे तीळ खाण्याचं प्रमाण जास्त आहे.
हृदयाच्या आरोग्यासाठी उत्तम -
रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी तीळ फायदेशीर असल्याचं अनेक संशोधनांमध्ये आढळून आलं आहे.
यामध्ये असलेलं मॅग्नेशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी उपयुक्त आहे. तिळामध्ये असलेलं व्हिटॅमिन ई आणि
advertisement
अँटी-ऑक्सिडंट रक्तवाहिन्यांमध्ये साठलेले थर कमी करण्यासाठी मदत करतात. काळ्या तिळामध्ये असलेला फायटोस्टेरॉल नावाचा घटक रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
ॲनिमियातून बरं होण्यासाठी उपयुक्त -
आणखी एक गुण म्हणजे ॲनिमियातून बरं होण्यासाठी तीळ उपयुक्त ठरू शकतात. भाजलेल्या तिळात
advertisement
प्रथिनांचं प्रमाण सर्वाधिक असते. याशिवाय, तिळात मेथिओनिन आणि सिस्टीन नावाची दोन अमीनो ऍसिड देखील असतात जी सहसा वनस्पती आधारित उत्पादनांमध्ये आढळत नाहीत.
रक्तातील साखर नियंत्रणासाठी उपयुक्त -
तिळातील प्रथिनं, गुड फॅट आणि कमी कार्बोहायड्रेटचं प्रमाण यामुळे रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यात मदत होते. पण, मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात तीळ समाविष्ट करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.
advertisement
पचनसंस्थेसाठी आवश्यक -
पचनसंस्था निरोगी ठेवण्यासाठीही तीळ उपयुक्त आहेत. तीळाचा आहारात समावेश केल्यानं बद्धकोष्ठतेचा
त्रास कमी होतो. बद्धकोष्ठता दूर करण्यासोबतच यामध्ये असलेली तंतूमयता पोटाशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी प्रभावी आहे.
त्वचेसाठी फायदेशीर -
आरोग्यासोबतच तीळ त्वचेसाठीही फायदेशीर आहेत. झिंक म्हणजेच जस्तामुळे, त्याची पेस्ट दूध आणि
मलईसह त्वचेवर चमक आणते. तिळाचं तेल त्वचेच्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे. त्यात असलेले व्हिटॅमिन ई
advertisement
आणि अँटीऑक्सिडंट्सच्या मदतीनं वृद्धत्वाची लक्षणं कमी करता येतात.
केसगळती रोखण्यासाठी उपयुक्त -
तीळ त्वचेसोबतच केसांसाठीही फायदेशीर आहे. यामध्ये असलेले अँटी-फंगल गुणधर्म टाळूसाठी उत्तम आहेत.
आणि कोंड्याची समस्याही दूर करतात. तिळामध्ये असलेले घटक केस गळती थांबवतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Sesame seeds - पांढरे तीळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे, आहारात करा समावेश
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement