Skin Care : चेहरा सतेज दिसण्यासाठी वापरा तांदुळाचं पीठ, 5 स्क्रब करतील जादू, आजच करा ट्राय
- Published by:Renuka Joshi
Last Updated:
तांदुळाचं पीठ वापरुन बनवलेले 5 स्क्रब चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत.
मुंबई : तांदळाच्या पिठाचा स्वयंपाकात वापर होतो आणि तांदूळाचं पीठ चेहऱ्यासाठीही उपयुक्त आहे. तांदुळाचं पीठ वापरुन बनवलेले 5 स्क्रब चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहेत. जाणून घ्या बनवण्याची सोपी पद्धत.
त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण अनेक घरगुती वस्तूंचा वेगवेगळ्या प्रकारे वापर करतो. तांदळाचं पीठही त्वचेच्या निगेसाठी उत्तम पर्याय आहे. यामुळे त्वचेला व्हिटॅमिन बी तसंच फायदेशीर अँटी-ऑक्सिडंट्स मिळतात. तांदळाच्या पिठापासून बनवलेला स्क्रब चेहऱ्यावर लावल्यामुळे वृद्धत्वाची लक्षणं तर कमी होतात आणि त्वचेवरील
अतिरिक्त तेल कमी होतं.
advertisement
तांदळाचं पीठ आणि दूध -
हा स्क्रब बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार तांदळाचं पीठ आणि दूध मिसळा. तुम्ही त्यात थोडी चॉकलेट पावडरही टाकू शकता. नीट मिक्स केल्यानंतर हा स्क्रब चेहऱ्यावर हलक्या हातानं चोळून धुवा. 15 ते 20 मिनिटं चेहऱ्यावर ठेवल्यानंतर हा स्क्रब तुम्ही काढून टाकू शकता.
advertisement
तांदळाचं पीठ आणि कोरफड -
तांदळाच्या पिठाचा हा स्क्रब त्वचेच्या मृत पेशी काढून टाकण्यासाठी उपयुक्त आहे. तांदळाचं पीठ घ्या आणि त्यात कोरफडीचा जेल मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर लावण्यासाठी वापरा. तुम्ही याचा उपयोग फेसपॅक म्हणूनही करु शकता.
तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ -
त्वचेच्या मृत पेशी आणि डाग काढून टाकण्यासाठी तांदळाचं पीठ आणि गव्हाचं पीठ एकत्र करून स्क्रब बनवू शकता. हा स्क्रब बनवण्यासाठी दोन्ही पिठं समान प्रमाणात घ्या आणि मिक्स करा. त्यात पाणी घालून पेस्ट बनवा.
advertisement
तुमचा स्क्रब तयार आहे.
तांदळाचं पीठ आणि ओट्स -
ओट्स आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेला स्क्रब त्वचेवर साचलेला घाणीचा थर काढून टाकतो.स्क्रब बनवण्यासाठी आवश्यकतेनुसार एक चमचा ओट्स, एक चमचा तांदळाचं पीठ, एक चमचा मध आणि
दूध एकत्र करून पेस्ट तयार करा. ते चेहऱ्यावर स्क्रब करण्याव्यतिरिक्त 10 मिनिटं तसंच ठेवू शकता.
तांदळाचं पीठ आणि मध -
advertisement
हा स्क्रब बनवणं खूप सोपं आहे. एक चमचा तांदळाच्या पिठात अर्धा चमचा मध मिसळा आणि
काही थेंब दुधात टाका. ते मिक्स करून अर्धा मिनिट चेहऱ्यावर चोळा आणि नंतर धुवून टाका. त्वचा उजळ होते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 07, 2024 12:58 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Skin Care : चेहरा सतेज दिसण्यासाठी वापरा तांदुळाचं पीठ, 5 स्क्रब करतील जादू, आजच करा ट्राय