50 वर्षांची परंपरा, नाशिकची ओम बजरंग मिसळ बनली खवय्यांची फेवरेट, तुफान प्रतिसाद, वेळ अन् लोकेशन काय, VIDEO

Last Updated:

famous misal in nashik - 1974 मध्ये अशोक सोनवणे यांनी नाशिक येथील जिल्हा न्यायालयाच्या प्रवेश द्वारासमोर बजरंग मिसळची सुरुवात केली. त्याकाळी न्यायालयीन काम आणि इतर कारणांसाठी सीबीएसला येणाऱ्या जिल्हाभरातील खवय्यांसाठी ही मिसळ पसंतीची बनली.

+
नाशिक

नाशिक ओम बजरंग मिसळ

कुणाल दंडगव्हाळ
नाशिक - नाशिक शहरातील खाद्यसंस्कृती ही सर्वत्र प्रसिद्ध आहे. येथील अनेक खाद्यपदार्थ लोकप्रिय होत आहेत. यातच म्हणजे येथील मिसळसुद्धा आता सर्वत्र प्रसिद्ध आहे. आता शहरात शेकडो ठिकाणी मिसळ विक्री केली जात आहे. यामध्ये एक व्यक्ती अशी आहे, जे 1974 पासून म्हणजे तब्बल 50 वर्षांपासून मिसळविक्रीचा व्यवसाय करत आहेत. ओम बजरंग मिसळ असे या मिसळचे नाव आहे. याचबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला आढावा.
advertisement
नाशिकमध्ये काही ठिकाणी घरगुती काळ्या मसाल्याचा वापर करुन बनवलेली मिसळ खायला मिळते. त्यातीलच एक म्हणजे शहरातील अशोक स्तंभ येथील ओम बजरंग मिसळ आहे. मागील 50 वर्षांपासून ही मिसळ नाशिककर खवय्यांच्या पसंतीस उतरली आहे. ओम बजरंग मिसळचे अमोल सोनवणे यांनी याबाबत लोकल18 शी बोलताना माहिती दिली.
यावेळी ते म्हणाले की, 1974 मध्ये अशोक सोनवणे यांनी नाशिक येथील जिल्हा न्यायालयाच्या प्रवेश द्वारासमोर बजरंग मिसळची सुरुवात केली. त्याकाळी न्यायालयीन काम आणि इतर कारणांसाठी सीबीएसला येणाऱ्या जिल्हाभरातील खवय्यांसाठी ही मिसळ पसंतीची बनली.
advertisement
सुरुवातीला भाकरी रस्साच्या स्वरुपात असलेल्या मिसळमध्ये हळूहळू बदल होत गेले आणि भाकरीच्या जागी पाव आला. मिसळसाठी वापरण्यात येणाऱ्या घरगुती काळ्या मसाल्याच्या या मिसळने आता खवय्यांच्या जीभेवर राज्य केले आहे.
काही काळानंतर स्मार्ट सिटीअंतर्गत न्यायालयासमोरील रस्त्याचे काम सुरू झाल्याने ही मिसळ अशोक स्तंभावर हलवण्यात आली. 1995 पासून अमोल सोनवणे यांच्या रुपाने दुसरी पिढी मिसळची जबाबदारी सांभाळत आहे. नाशिकमध्ये सर्वत्र ही मिसळ प्रसिद्ध झाली आहे. घरी बनवलेल्या काळ्या मसाल्यापासून पहाटे 5 वाजेपासून ही मिसळ बनायला सुरवात होते. या मसाल्यामध्ये शरीरासाठी हानिकारक असले कुठलेही पदार्थ टाकले जात नसल्याचे त्यांनी सांगितले. इतकेच नाही तर यांची मिसळ खाल्ल्यावर कोणाला काही आम्लपित्ताचा त्रास झाला तर आम्ही त्याची जबाबदारी घेतो, असेही ते सांगतात.
advertisement
काय आहे दर -
याठिकाणी ही मिसळ 70 रुपये प्लेट या दराने मिळते. अशोक स्तंभ या परिसरात बजरंग मिसळ या नावाने यांची मिसळची गाडी सकाळी 6 वाजेपासून ते दुपारी 2 पर्यंत उपलब्ध आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
50 वर्षांची परंपरा, नाशिकची ओम बजरंग मिसळ बनली खवय्यांची फेवरेट, तुफान प्रतिसाद, वेळ अन् लोकेशन काय, VIDEO
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement