आपट्याची पानं आहेत फारच गुणकारी, आयुर्वेदिक फायदेही आहेत खूपच, VIDEO

Last Updated:

ayurvedic importance of apata leaf - आपट्याच्या पानांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे महत्त्व नेमके काय आहे, याचा आपल्याला कसा फायदा होतो, याचविषयी आपण जाणून घेऊयात.

+
आपट्याच्या

आपट्याच्या पानाचे युर्वेदिक महत्त्व

अपूर्वा तळणीकर, प्रतिनिधी
छत्रपती संभाजीनगर : सध्या नवरात्रोत्सवाला उत्साहात सुरुवात झाली आहे. नवरात्रीचे 9 दिवस देवीची मनोभावे पूजा केली जाते. यानंतर 10 व्या दिवशी सर्वजण विजयादशमी म्हणजेच दसरा सण साजरा करतात. याच दसऱ्याच्या दिवशी आपण एकमेकांना आपट्याची पाने ही सोने म्हणून एकमेकांना देतो. या आपट्याच्या पानांचे आयुर्वेदाच्या दृष्टीने देखील खूप महत्त्व आहे. त्यामुळे हे महत्त्व नेमके काय आहे, याचा आपल्याला कसा फायदा होतो, याचविषयी आपण जाणून घेऊयात.
advertisement
आहारतज्ञ अलका कर्णिक यांनी याबाबतची माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, जर तुमच्या शरीरामध्ये खूप उष्णता असेल, तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये ॲसिडिटीचा त्रास असेल, बद्धकोष्ठतेचा त्रास असेल, तुम्हाला अपचनाच्या समस्या असतील, खूप जुन्या वेदना असतील तर या सर्व आजारांवर तुम्ही आपट्याची पाने पाण्यात भिजत घालून त्याचा रस जर काढला आणि तो रस सकाळचे जेवण झाल्यावर घेतला तर हे सर्व आजार दूर व्हायला मदत होते.
advertisement
नवरात्रीत अनेकजण 9 दिवस उपवास करतात आणि त्यानंतर अनेक जणांना अपचनाचा किंवा अॅसिडिटीचा त्रास होतो. तर अशा लोकांनी उपवास सोडल्यानंतर सकाळचे जेवण झाल्यानंतरच दोन पानांचा रस जर घेतला तर तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. तसेच दीर्घकाळ याचा तुम्हाला फायदा होईल.
advertisement
तसेच हा रस तयार करताना आपट्याची पाने साधारणपणे 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घालावी. त्यानंतर मिक्सरमध्ये ही आपट्याची पाने टाकावी, त्यामध्ये थंडगार पाणी टाकावे, यानंतर त्याचा रस काढावा आणि तो रस घ्यावा. हा रस प्यायल्याने आरोग्याला फायदा होतो.
जर तुम्हाला भूक लागत नसेल त्यासाठीही तुम्ही आपट्याच्या पानाची पावडर करून ही चिमूटभर पावडर पाण्यामध्ये टाकून सकाळी उपाशीपोटी घेतली तर तुम्हाला मदत होऊ शकते. पण हे सर्व वैद्यकीय सल्ल्याने किंवा मार्गदर्शनाने घ्यावे, असेही त्या म्हणाल्या.
advertisement
सूचना - ही माहिती आरोग्यतज्ज्ञांशी झालेल्या संवादावर आधारित आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. वैयक्तिक सल्ला नाही. याबाबत लोकल18 कोणताही दावा करत नाही. कोणतीही गोष्ट फॉलो करण्यापूर्वी डॉक्टरांशी एकदा अवश्य चर्चा करा.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
आपट्याची पानं आहेत फारच गुणकारी, आयुर्वेदिक फायदेही आहेत खूपच, VIDEO
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement