चेहऱ्यावरचा गोडवा आणि मनात स्वार्थ! 'या' 4 राशींचे लोक असतात स्वार्थी, तुमच्या खास व्यक्तीची रास नाही ना यात?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव आणि गुणधर्म असतात. काही राशींचे लोक अत्यंत दयाळू आणि मदतीला धावून जाणारे असतात, तर काही राशींच्या बाबतीत 'कामापुरता मामा' ही म्हण तंतोतंत लागू पडते.
Selfish Zodiacs : ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक राशीचा स्वतःचा स्वभाव आणि गुणधर्म असतात. काही राशींचे लोक अत्यंत दयाळू आणि मदतीला धावून जाणारे असतात, तर काही राशींच्या बाबतीत 'कामापुरता मामा' ही म्हण तंतोतंत लागू पडते. या व्यक्ती स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात आणि आपले काम पूर्ण करून घेण्यात त्या अत्यंत निष्णात असतात.
मेष: स्वतःच्या इच्छेला सर्वोच्च प्राधान्य
मेष राशीचा स्वामी मंगळ आहे, जो त्यांना अत्यंत ऊर्जावान आणि महत्त्वाकांक्षी बनवतो. मात्र, अनेकदा ही महत्त्वाकांक्षा स्वार्थाचे रूप घेते. हे लोक अनेकदा फक्त स्वतःचाच विचार करतात. त्यांना एखादी गोष्ट हवी असेल, तर ती मिळवण्यासाठी ते इतरांच्या भावनांचा विचार करत नाहीत. आपले ध्येय गाठण्यासाठी ते समोरच्या व्यक्तीचा वापर करू शकतात आणि काम झाल्यावर त्यांना विसरण्यासही त्यांना वेळ लागत नाही.
advertisement
मिथुन: बोलण्यातून काम काढून घेण्यात पटाईत
मिथुन राशीचे लोक संवाद साधण्यात अत्यंत कुशल असतात, पण याच गुणाचा वापर ते आपला स्वार्थ साधण्यासाठी करतात. या राशीच्या व्यक्तींना अनेकदा 'दुटप्पी' मानले जाते. ते तुमच्याशी इतक्या गोड बोलतील की तुम्हाला त्यांचा स्वार्थ समजणारच नाही. जोपर्यंत समोरच्या व्यक्तीकडून त्यांना काही फायदा मिळत असतो, तोपर्यंतच ते मैत्री टिकवून ठेवतात. फायदा संपला की ते लांब होण्यास सुरुवात करतात.
advertisement
कन्या: अत्यंत व्यावहारिक आणि संधीसाधू
कन्या राशीचे लोक स्वभावाने साधे वाटत असले तरी, ते अत्यंत व्यावहारिक असतात. ते प्रत्येक नाते आणि मैत्रीत स्वतःचा फायदा शोधतात. हे लोक खूप विचार करून कोणाशीही संबंध जोडतात. जर त्यांना वाटले की एखाद्या व्यक्तीकडून त्यांना काही लाभ होणार नाही, तर ते त्यांच्याशी जवळीक साधत नाहीत. स्वतःचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी ते इतरांचे काम बिघडवण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत.
advertisement
मकर: प्रगतीसाठी कोणाचाही बळी देऊ शकतात
मकर राशीचे लोक अत्यंत शिस्तप्रिय आणि करिअरला महत्त्व देणारे असतात. पण प्रगतीच्या शर्यतीत ते अनेकदा भावनाशून्य होतात. त्यांना जीवनात यश मिळवायचे असते आणि त्यासाठी ते कोणाशीही हातमिळवणी करू शकतात. पण एकदा का त्यांनी शिखर गाठले की, ज्यांनी त्यांना मदत केली त्यांनाच ते विसरतात. हे लोक अत्यंत धूर्तपणे आपली चाल खेळतात, ज्यामुळे समोरच्याला ते 'मतलबी' आहेत हे खूप उशिरा लक्षात येते.
advertisement
टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 6:31 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
चेहऱ्यावरचा गोडवा आणि मनात स्वार्थ! 'या' 4 राशींचे लोक असतात स्वार्थी, तुमच्या खास व्यक्तीची रास नाही ना यात?









