advertisement

गॅस टंचाईचं संकट, बचावासाठी ट्विंकल खन्नाने लढवली शक्कल, अक्षय कुमार म्हणतो "माझ्या बायकोने..."

Last Updated:

Akshay Kumar: फक्त सामान्यच नाही, तर सेलिब्रिटींनाही गॅस टंचाईचा फटका बसत असल्याचं दिसतंय. नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने याबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे.

News18
News18
मुंबई: सध्या एकाच गोष्टीने संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे, ते म्हणजे इराण आणि इस्राइल यांच्यामध्ये सुरू असलेलं युद्ध. या दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचे पडसाद आता भारतावर पडू लागल्याचं पाहायला मिळतंय. देशात खाद्यतेलाच्या किंमतींमध्ये वाढ झाली असून LPG सिलेंडरची टंचाई भासू लागल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळतंय. फक्त सामान्यच नाही, तर सेलिब्रिटींनाही याचा फटका बसत असल्याचं दिसतंय. नुकतंच एका मुलाखतीत बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारने याबाबत आपली चिंता व्यक्त केली आहे.
मुंबई महानगरपालिकेच्या 'मुंबई क्लीन लीग' या कार्यक्रमाला अक्षय कुमारने हजेरी लावली होती. बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या 'मुंबई क्लीन लीग' या कार्यक्रमात अक्षयने मुंबईला स्वच्छ ठेवण्यासाठी एक नवीन कल्पना मांडली. अक्षयला आयपीएलच्या धर्तीवर मुंबईत स्वच्छतेची स्पर्धा सुरू करण्याची कल्पना सुचली. त्यानुसार 'मुंबई क्लीन लीग' सुरू करण्यात आली आहे. ही स्पर्धा डिसेंबरपर्यंत चालेल, ज्यात गृहनिर्माण सोसायट्या, हॉटेल्स, रुग्णालये आणि झोपडपट्टी भागांना सहभागी होता येईल. स्वच्छतेचे फोटो अपलोड करण्यासाठी बीएमसीकडून एक विशेष QR कोडही जारी केला जाणार आहे.
advertisement

ट्विंकल खन्नालाही सतावतेय गॅस टंचाईची चिंता

या कार्यक्रमादरम्यान पत्रकारांनी त्याला देशातील गॅस टंचाईबाबत विचारले असता तो म्हणाला, सध्यातरी आमच्या घरात गॅसची काहीही टंचाई नाही आहे. पण माझी पत्नी ट्विंकल खूप सतर्क आहे. भविष्याची खबरदारी म्हणून तिने आधीच आधीच दोन इंडक्शन शेगड्या ऑर्डर केल्या आहेत. त्या घरी पोहोचल्या आहेत की नाही, हे मला माहीत नाही, पण तिने बॅकअप प्लॅन तयार ठेवलाय." त्याच्या या हजरजबाबीपणामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.
advertisement
advertisement
मुंबईतील वाढत्या प्रदूषणाबद्दल (AQI) विचारले असता अक्षयने सकारात्मक भूमिका मांडली. तो म्हणाला, "प्रत्येक गोष्टीमध्ये चुका काढणे बंद करा. जर एका खोलीत दहा बल्ब असतील आणि एक बल्ब चालत नसेल, तर त्यावरच लक्ष केंद्रित करण्यापेक्षा बाकीच्या नऊ चालणाऱ्या बल्बांकडे बघा."
कामाबद्दल बोलायचे झाले तर, अक्षय लवकरच प्रियदर्शन यांच्या 'भूत बंगला' या हॉरर कॉमेडीमध्ये दिसणार आहे. याशिवाय 'हायरान', 'वेलकम टू द जंगल' आणि 'हेरा फेरी ३' यांसारखे मोठे चित्रपट देखील त्याच्या रांगेत आहेत.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
गॅस टंचाईचं संकट, बचावासाठी ट्विंकल खन्नाने लढवली शक्कल, अक्षय कुमार म्हणतो "माझ्या बायकोने..."
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement