छत्रपती संभाजीनगरमध्ये 450 सिलेंडरचा संशयास्पद साठा,MIDCच्या कारवाईत घटना उघड, गॅसचा तुटवडा असताना चाललंय काय?
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल 450 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला आहे.
Chhatrapati Sambhaji Nagar Gas Issue : अविनाश कानडजे, प्रतिनिधी,छत्रपती संभाजीनगर : राज्यात गॅसचा तुटवडा नसल्याचे सरकार सांगत असताना देखील सामान्य नागरीक दररोज गॅस एजन्सीत मोठमोठाल्या रांगा लावत आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या मते गॅसचा तु़टवडा असल्याची माहिती आहे. असे असताना छत्रपती संभाजीनगरमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये 450 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला आहे. MIDC अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. त्यामुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज MIDC परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेमध्ये बंद पडलेल्या एका कंपनीमध्ये तब्बल 450 रिकाम्या गॅस सिलेंडरचा साठा आढळून आला आहे. MIDC अधिकाऱ्यांनी अचानक केलेल्या तपासणीत हा प्रकार उघड झाला. विशेष म्हणजे, हे सर्व सिलेंडर एका कंपनीचे नसून वेगवेगळ्या कंपन्यांचे असल्यामुळे या प्रकरणाला अधिक गंभीर वळण मिळाले आहे.बंद कंपनीच्या आडून हा साठा नेमका कशासाठी ठेवण्यात आला होता? काळाबाजाराचा हा भाग आहे का? की फक्त गोडाऊन म्हणून या जागेचा वापर होत होता? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
advertisement
संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करत सर्व सिलेंडर पोलिसांच्या ताब्यात देण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. हा साठा नेमका कशासाठी ही सध्या सांगता येणार नाही मात्र आम्ही कारवाई पूर्ण करू अशी अधिकाऱ्यांनी माहिती दिली, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, लवकरच यामागचं नेमकं सत्य समोर येण्याची शक्यता आहे.
खरं तर आम्ही एमआयडीसीत जे उद्योग बंद झाले आहेत ते उद्योग अनधिकृतपणे पुन्हा सूरू तर नाहीत ना, याची तपासणी करण्यासाठी आम्ही आलो होतो.त्यावेळी आम्हाला गोडाऊन आढळलं. त्यावेळी आम्ही बाहेरून पाहिले असता आम्हाला सिलेंडर दिसले. नंतर तपासणी केली असता आम्हाला 400-450सिलिंडर रिकामी असल्याचे आढळले. हे सिलिंडर आम्ही आता पोलीस स्टेशनला जमा करत आहोत.तसेच आजुबाजूला चौकशी केली असता संबंधित गॅस हे एजन्सीचे असल्याची माहिती देण्यात आली.पण एजन्सी असल्याचे कुठेही कागदपत्रे सादर करण्यात आली नाही.त्यामुळे हे सिलिंडर आता पोलीस ठाण्यात जमा करत आहोत,अशी माहिती एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Mar 17, 2026 6:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छत्रपती संभाजीनगरमध्ये 450 सिलेंडरचा संशयास्पद साठा,MIDCच्या कारवाईत घटना उघड, गॅसचा तुटवडा असताना चाललंय काय?







