Back Pain : बाईकवर सतत फिरल्यामुळे कंबरदुखीचा त्रास वाढलाय? 'ही' प्रभावी योगासने देतील त्वरित आराम

Last Updated:

Yoga For Back Pain Relief : दररोज बाईक चालवल्यामुळे कंबरदुखीचा त्रास तुम्हालाही होत आहे. या सोप्या आणि प्रभावी योगासनांच्या मदतीने कंबरदुखीपासून त्वरित आराम मिळवता येतो तसेच शरीराला लवचिकताही मिळते.

News18
News18
Yoga For Bikers : आजकाल बाईकवरून ऑफिस तसेच कामानिमित्त किंवा रोजच्या प्रवासासाठी बराच वेळ खर्च होतो. लांब वेळ बाईकवर बसल्यामुळे पाठीला सतत वाकलेल्या स्थितीत राहावे लागते. त्यामुळे कंबर, पाठीचा कणा आणि मानेला त्रास जाणवू शकतो. सुरुवातीला हा त्रास किरकोळ वाटला तरी तो दीर्घकाळ टिकल्यास कंबरदुखी गंभीर होऊ शकते. औषधांचा आधार घेण्यापेक्षा या सोप्या आणि प्रभावी योगासनांचा सराव केल्यास वेदना कमी होतात आणि शरीर अधिक लवचिक बनते.
1) भुजंगासन -
भुजंगासनामुळे पाठीचा कणा मजबूत होतो.
कसे करावे-
  • पोटावर झोपा आणि हात खांद्याच्या जवळ जमिनीवर ठेवा.
  • हळूहळू श्वास घेत छाती वर उचला.
  • कंबर खाली दाबून ठेवा आणि १५-२० सेकंद या स्थितीत राहा.
  • श्वास सोडत पुन्हा खाली या.
  • दररोज ३-४ वेळा हे आसन केल्याने कंबरदुखी कमी होते.
2) बालासन
हे आसन आरामदायी आहे आणि कंबरेतील वेदना कमी करण्यात मदत करते.
advertisement
कसे करावे-
  • गुडघे टेकवून बसा आणि पुढे वाका.
  • कपाळ जमिनीवर टेकवा व हात पुढे लांबवा.
  • संपूर्ण शरीर रिलॅक्स करा.
  • 30 सेकंद या स्थितीत राहा.
  • बालासन केल्याने तणाव कमी होतो आणि कंबर हलकी वाटते.
3) पवनमुक्तासन
हे पोट आणि कंबरेच्या वेदनांसाठी अत्यंत प्रभावी आसन मानले जाते. हे कल्याने पाठीच्या मणक्यावरील ताण कमी होतो.
कसे करावे-
advertisement
  • पाठीवर सरळ झोपा.
  • श्वास घेत दोन्ही पाय गुडघ्यात वाकवा आणि छातीशी लावा.
  • हातांनी पाय घट्ट पकडा.
  • हनुवटी गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न करा.20-30 सेकंद या स्थितीत राहा, मग हळूहळू
  • पाय सोडा.
योगा करताना घ्यावयाची खबरदारी
योगा करताना काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. सुरुवातीला जास्त वेळ आसनं करू नयेत. हळूहळू वेळ आणि पुनरावृत्ती वाढवावी. पोट रिकामे असताना किंवा हलके आहार घेतल्यानंतरच योगाभ्यास करावा. जर कंबरदुखी तीव्र असेल किंवा जुनी दुखापत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. आसनं करताना शरीरावर अनावश्यक ताण देऊ नये, नाहीतर त्रास वाढू शकतो. योगासने नेहमी शांत वातावरणात, मऊ चटईवर आणि योग्य पद्धतीने करावीत.(वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Back Pain : बाईकवर सतत फिरल्यामुळे कंबरदुखीचा त्रास वाढलाय? 'ही' प्रभावी योगासने देतील त्वरित आराम
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement