Winter Health Tips : चविष्ट शिंगाडे आरोग्यासाठीही गुणकारी, थायरॉईडसह 'या' समस्येवरही रामबाण
- Published by:Pooja Jagtap
- local18
- Reported by:Pragati Bahurupi
Last Updated:
Benefits Of Eating Shingada In Winter : हिवाळा सुरु होताच बाजारात दिसणारा शिंगाडा फक्त चविष्ट नसून आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. आयोडिन, मॅगनीज, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि पाण्याचे प्रमाण हे सर्व या फळात आहे.
मुंबई : हिवाळा सुरु होताच बाजारात दिसणारा शिंगाडा फक्त चविष्ट नसून आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त आहे. आयोडिन, मॅगनीज, कॅल्शियम, अँटी-ऑक्सिडेंट्स आणि पाण्याचे प्रमाण हे सर्व या फळात आहे. यामुळे हे फळ शरीरातील अनेक समस्यांवर नैसर्गिक उपाय म्हणून काम करते. चला तर जाणून घेऊया शिंगाडे खाण्याचे प्रमुख फायदे कोणते आहेत?
1. शिंगाडे रक्त वाढवण्यास सहाय्यक आहेत. शिंगाडे शरीरातील हिमोग्लोबिन वाढवण्यास मदत करतात. त्यामुळे अशक्तपणा, कमजोरी यांसारख्या तक्रारी कमी होतात. ऊर्जा देणारे हे फळ उपवासाच्या दिवशी विशेषतः खाल्ले जाते.
2. शिंगाडे डिहायड्रेशनपासून बचाव करतात. शिंगाड्यात पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने शरीरातील द्रव संतुलन टिकून राहते. हिवाळ्यात पाणी कमी प्यायल्यास डिहायड्रेशन होऊ शकते, अशावेळी शिंगाडे उत्तम नैसर्गिक पर्याय ठरतात.
advertisement
3. शिंगाडे थायरॉईडसाठी उपयुक्त आहेत. शिंगाड्यात आयोडिन आणि मॅगनीज हे दोन्ही घटक मुबलक प्रमाणात असतात. हे घटक थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित कार्य करण्यास मदत करतात. विशेषत: आयोडिनमुळे घशासंबंधी तक्रारी आणि थकवा कमी होण्यास मदत होते.
4. शिंगाडे पचन सुधारते, बद्धकोष्ठतेपासून आराम देते. शिंगाड्याचे पीठ आतड्यांसाठी खूप लाभदायक मानले जाते. यातील फायबर पचनसंस्था मजबूत ठेवते आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर करण्यास मदत करते. नियमित सेवनाने पोट हलके आणि आरामदायी राहते.
advertisement
5. केसांच्या आरोग्यासाठी देखील शिंगाडे गुणकारी आहेत. यातील लॉरिक ऍसिड केसांची मुळं मजबूत करण्यास मदत करतं. नियमित सेवनामुळे केसगळती कमी होण्यास मदत मिळते आणि केस अधिक निरोगी दिसतात.
6. शिंगाडे सेवन केल्यास सर्दी-खोकल्यात आराम मिळतो. शिंगाडे बारीक करून तयार केलेले चूर्ण रस, चहा किंवा पाण्यासोबत घेतल्यास खोकला कमी होतो. यातील अँटी-ऑक्सिडेंट घशातील सूज कमी करतात तसेच कफ कमी करण्यास मदत करतात.
advertisement
7. शिंगाडेमुळे हाडे आणि दात मजबूत होतात. शिंगाड्यात भरपूर कॅल्शियम असल्याने हाडांची घनता वाढते आणि दातही मजबूत होतात. वाढत्या वयात हाडे कमजोर होऊ नयेत यासाठी शिंगाड्यांचे सेवन फायदेशीर मानले जाते.
शिंगाडे हे हंगामी पण अत्यंत पौष्टिक फळ आहे. योग्य प्रमाणात आणि नियमित सेवन केल्यास शरीराला अनेक प्रकारे फायदा होतो. हिवाळ्यातील आहारात शिंगाड्यांचा समावेश नक्की करून बघा.
advertisement
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि आरोग्याशी संबंधित सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून, डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच काहीही वापरा. त्याच्या वापरामुळे होणाऱ्या कोणत्याही नुकसानासाठी लोकल-18 जबाबदार राहणार नाही.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 20, 2025 5:42 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Winter Health Tips : चविष्ट शिंगाडे आरोग्यासाठीही गुणकारी, थायरॉईडसह 'या' समस्येवरही रामबाण

