'या' 7 पदार्थांमध्ये दडलंय तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य; तारुण्य राहील टिकून, गालांवर येईल चमक

Last Updated:

जर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी चं नियमित सेवन केलं तर तुमचं तारुण्य टिकून राहील. पण असे कोणते पदार्थ आहेत ज्यातून  भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं जाणून घ्या...

 या पदार्थांमध्ये दडलंय चेहऱ्याचं सौंदर्य
या पदार्थांमध्ये दडलंय चेहऱ्याचं सौंदर्य
मुंबई : आपल्या शरीरातील सर्वात मोठा अवयव म्हणजे आपली त्वचा आहे. निखळ त्वचेमुळे चेहऱ्याच्या सौंदर्यात भर पडते. जोपर्यंत त्वचेत चमक आहे तोपर्यंत तारुण्य टिकून आहे. त्वचेचा रंग फिका पडू लागताच सौंदर्यही कमी होऊ लागतं. पण नक्की काय केल्यानं त्वचेवर चमक दिसते हे तुम्हाला माहितीये का? त्वचेखालील स्नायूंना कोलॅजन असं म्हणतात. या कोलॅजनमुळेच त्वचा चांगली दिसते. एखाद्या व्यक्तीच्या गालाखाली जितकं जास्त कोलॅजन असेल तितकी त्याची त्वचा अधिक सुंदर दिसते. पण हे कोलॅजन वाढवण्यासाठी त्वचेला व्हिटॅमिन सीची सर्वाधिक गरज असते. जर तुम्ही तुमच्या आहारात व्हिटॅमिन सी चं नियमित सेवन केलं तर तुमचं तारुण्य टिकून राहील. पण असे कोणते पदार्थ आहेत ज्यातून  भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं जाणून घ्या...
 या पदार्थांमध्ये दडलंय चेहऱ्याचं सौंदर्य
या यादीतील पहिला पदार्थ ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्यावाचून राहणार नाही. हा पदार्थ आहे लाल मिरची. वोग इंडियाच्या रिपोर्टनुसार, लाल मिरची व्हिटॅमिन सीने भरपूर आहे. 100 ग्रॅम लाल मिरचीमध्ये 229 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं. यासोबतच यामध्ये व्हिटॅमिन ए आणि रेटिनॉल देखील असतं जे तुमचं वय चेहऱ्यावर दिसण्यापासून रोखतं. त्यामुळे रोज कोणत्यातरी माध्यमातून थोडी मिरची खाणं चांगलं असतं.
advertisement
पेरू - 100 ग्रॅम पेरूमध्ये 228 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं. यासोबतच त्यात पॉलीफेनॉल, कॅरोटीनॉइड्स आणि इतर अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्स असतात जे त्वचा सुधारण्यास मदत करतात.
शिमला मिरची - लाल आणि पिवळी शिमला मिरची त्वचेवर चमक आणण्यासाठी खूप उपयुक्त आहे. 100 ग्रॅम सिमला मिरचीमध्ये 166 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं.
advertisement
संत्री प्रत्येकजण खातात, परंतु जर तुम्ही ती नियमितपणे खाल्ली तर यामुळे तुमच्या चेहऱ्यावर चमक तर येतेच पण त्यामुळे रोगप्रतिकारशक्तीही वाढते. एका संत्र्यामध्ये 75 मिलीग्राम पर्यंत व्हिटॅमिन सी असते. पण संत्र्याचा रस काढल्यानंतर लगेच प्या.
ब्रोकोली- ब्रोकोली हे व्हिटॅमिन सीचं पॉवरहाऊस आहे. एकूणच आरोग्यासाठी ब्रोकोली ही अतिशय उपयुक्त भाजी आहे. फक्त 28 ग्रॅम ब्रोकोलीमध्ये तब्बल 89 मिलीग्राम व्हिटॅमिन सी असतं.
advertisement
स्ट्रॉबेरी - स्ट्रॉबेरी हा व्हिटॅमिन सीचा खजिना आहे. आठवड्यातून चार-पाच दिवस सुद्धा चार-पाच स्ट्रॉबेरी खाल्ल्यास चेहऱ्यावरची चमक कायम राहते.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
'या' 7 पदार्थांमध्ये दडलंय तुमच्या चेहऱ्याचं सौंदर्य; तारुण्य राहील टिकून, गालांवर येईल चमक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement