advertisement

ना धुरंधर, ना जवान, 85 लाखांच्या चित्रपटाने केलेली 9 पट कमाई; 100 दिवस तुडुंब भरलेले थिएटर

Last Updated:
राजेश खन्ना यांनी त्यांच्या संपूर्ण फिल्मी करिअरमध्ये अनेक रोमँटिक चित्रपटांत काम केलं. 'त्या' एका चित्रपटानं त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यांना एका रात्रीत स्टार बनवलं. चित्रपटानं तीन महिन्यामध्ये कोट्यवधींची कमाई केली होती.
1/6
 बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध सेलिब्रिटींमध्ये राजेश खन्ना यांचं नाव प्रामुख्याने घेतलं जातं. दमदार अभिनय आणि आपल्या खास शैलीसाठी ओळखल्या जाणाऱ्या राजेश खन्ना यांनी आपल्या चाहत्यांना अनेक सुपर डूपर हिट सिनेमे दिले आहेत.

2/6
 त्या सुपर डूपर हिट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणजे 'आराधना'.... राजेश खन्ना यांनी त्यांच्या संपूर्ण फिल्मी करिअरमध्ये अनेक रोमँटिक चित्रपटांत काम केलं. त्यापैकीच एक 'आराधना' चित्रपट आहे. या चित्रपटानं त्यांचं आयुष्य बदललं आणि त्यांना एका रात्रीत स्टार बनवलं.

3/6
 1969 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'आराधना' रोमँटिक ड्रामा चित्रपटात राजेश खन्ना यांच्यासोबत शर्मिला टागोर मुख्य भूमिकेत होते. 'आराधना' थिएटरमध्ये सतत 100 दिवस चालणारा पहिला हिंदी चित्रपट बनून इतिहास रचला. प्रेक्षकांनी तो चित्रपट तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ थिएटरमध्ये पाहिला.

4/6
 हवाई दलाच्या अधिकाऱ्याच्या जीवनावर आधारित असलेल्या 'आराधना'ची स्टोरी इमोशनल आणि रोमँटिक होती. चित्रपटात राजेश खन्ना यांनी पायलट आणि नंतर त्यांच्या मुलाची भूमिका केली, तर शर्मिला टागोर यांनी महिलेच्या संवेदनशील भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली. दोघांची केमिस्ट्री इतकी मजबूत होती की, त्यांनी प्रेक्षकांची मनं जिंकली.

5/6
 चित्रपटामध्ये "मेरे सपनो की रानी कब आयेगी तू" सारखी अनेक सुपरहिट गाणी आहेत, जी आजही सुपरहिट ठरली असून अजूनही सर्वांच्या स्मार्टफोनवर आपल्याला ऐकायला मिळतात. सचिन देव बर्मन यांचे संगीत आणि किशोर कुमार यांच्या आवाजाने हा चित्रपट हिट ठरला. आराधनाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. 80 ते 85 लाखांचे बजेट असलेल्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 7 कोटींची कमाई केली होती.

6/6
 आराधना चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आणि अनेक विक्रम मोडीत काढले. हा चित्रपट देशभरात तीन वर्षे चालला, विशेषतः दक्षिण भारतात, त्याचा तेलुगू रिमेक देखील बनवण्यात आला, जो तिथेही प्रचंड हिट झाला. चित्रपटाला फिल्मफेअर पुरस्कारांसह अनेक सन्मान मिळाले. या यशानं राजेश खन्नांच्या कारकिर्दीला नव्या उंचीवर नेले. ते एक उत्तम अभिनेते होते, आराधनानंतर त्यांना 'सुपरस्टार' पदवी मिळाली. चाहते त्यांना 'काका' म्हणून हाक मारायचे.

WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement