advertisement

अनैतिक संबंधातून जीव मारला, २० दिवसांच्या थरारानंतर चाकणमधील 'त्या' खुनाचा उलगडा

Last Updated:

बिरदवडी गावच्या स्मशानभूमीमागील ओढ्याजवळ ११ जानेवारी २०२६ रोजी एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता.

चाकण हत्या प्रकरण
चाकण हत्या प्रकरण
गोविंद वाकडे, प्रतिनिधी, पिंपरी चिंचवड : चाकण उत्तर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बिरदवडी येथे झालेल्या एका अज्ञात तरुणाच्या खुनाचा गुंता पोलिसांनी २० दिवसांच्या अथक परिश्रमानंतर सोडवला आहे. अनैतिक संबंधांच्या वादातून हा खून झाल्याचे तपासात समोर आले असून, पोलिसांनी याप्रकरणी तीन आरोपींना अटक केली आहे.
बिरदवडी गावच्या स्मशानभूमीमागील ओढ्याजवळ ११ जानेवारी २०२६ रोजी एका २५ ते ३० वयोगटातील तरुणाचा मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळला होता. आरोपींनी त्याची ओळख पटू नये यासाठी डोक्यात धारदार हत्याराने वार करून आणि तोंडावर दगड घालून क्रूरपणे हत्या केली होती. तसेच पुराव्यासाठी त्याचे ओळखपत्र आणि मोबाईलही लंपास केला होता.

मोपेड गाडीची माहिती हाती लागली अन्...

advertisement
या घटनेचा कोणताही पुरावा नसताना पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, खबऱ्यांकडून मिळालेली माहिती आणि परिसरातील कामगार अड्ड्यांवर मयताचा फोटो दाखवून ओळख पटवण्याचा प्रयत्न केला. तपासादरम्यान एका मोपेड गाडीची माहिती हाती लागली, ज्यावरून आरोपी निखिल नानासाहेब चव्हाण याच्यापर्यंत पोलीस पोहोचले.

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपी पोपटासारखा बोलला

पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीने गुन्हा कबूल केला. मयत मुंजा धोंडीबा नरहिरे याचे आरोपी निखिलच्या आईशी अनैतिक संबंध होते. मयताकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून निखिल, त्याचा मित्र स्वप्नील नरहरी पारधी आणि आरोपी यांची आई यांनी मिळून खुनाचा कट रचला होता.
advertisement

दारू पिण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले अन्...

आरोपींनी मुंजा याला गंगाखेडहून चाकणला बोलावून घेतले. ७ जानेवारी रोजी त्याला दारू पिण्याच्या बहाण्याने निर्जनस्थळी नेले आणि कोयत्याने वार करून तसेच डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली होती.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
अनैतिक संबंधातून जीव मारला, २० दिवसांच्या थरारानंतर चाकणमधील 'त्या' खुनाचा उलगडा
Next Article
advertisement
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; भर न्यायालयात 'प्रायव्हसी'चा फुगा फुटला, 213 कोटींचा दंड
WhatsAppला कोर्टाचा दणका, नियम पाळता येत नसेल तर भारत सोडा; 213 कोटींचा दंड
  • WhatsAppच्या प्रायव्हसी पॉलिसीवर कोर्टाचा घणाघात

  • आम्हालाच तुमची पॉलिसी समजत नाही, तर गरिबांचं काय?

  • 213 कोटींचा दंड, तरीही डेटा शेअरिंग

View All
advertisement