गोळ्यांपेक्षाही पावरफुल या 3 पालेभाज्या, खाल तर आजार जवळही फिरकणार नाही
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
चने का साग अर्थात हरभऱ्याच्या पाल्याची भाजी म्हणजे शरीराला जणू वरदानच...
मुंबई : हिंदीमध्ये ज्याला साग म्हटलं जातं, त्याचा अर्थ पाल्याची भाजी. हिंदी चित्रपटांमुळे 'सरसों का साग' ही रेसिपी अनेकांना माहिती असते. त्याप्रमाणेच, पालक का साग, चने का साग यादेखील चविष्ट भाज्या असतात. अनेकांना त्या आवडतात. त्यामुळे यातली सर्वोत्तम भाजी कोणती असं विचारलं, तर अनेकांना नेमकी कोणती निवडावी असा प्रश्न पडू शकतो; मात्र आरोग्याच्या दृष्टीने विचार केला, तर संशोधनातून हे सिद्ध झालं आहे, की चने का साग म्हणजेच हरभऱ्याच्या हिरव्या पाल्याची भाजी सर्वश्रेष्ठ आहे.
हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीमध्ये प्रोटीन्स, फायबर्स, लोह, कॅल्शियम आणि अनेक व्हिटॅमिन्स असतात. हरभऱ्याच्या पाल्यामध्ये अनेक प्रकारचे मायक्रोन्यूट्रिएंट्स, अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे शरीराला सर्व प्रकारच्या गंभीर विकारांपासून संरक्षण मिळतं. डायबेटीस, हृदयविकार आणि लठ्ठपणा हे विकार दूर ठेवण्यास हरभऱ्याच्या पाल्याची भाजी मदत करू शकते. हरभऱ्याच्या पाल्याची भाजी बाजरीच्या भाकरीसोबत खाल्ली, तर अधिकच उत्तम. बाजरी हे एक सुपरफूड आहे. त्यामुळे अनेक विकार दूर राहण्यास मदत होते. त्याला हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीची जोड मिळाली, तर उत्तमच.
advertisement
हरभऱ्याच्या पाल्याची उपयुक्तता
सर्व पालेभाज्यांमध्ये हरभऱ्याच्या पाल्याची भाजी सर्वोत्तम असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे. इकॉनॉमिक टाइम्समध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार, जर्नल ऑफ द सायन्स ऑफ फूड अँड अॅग्रिकल्चर यामध्ये हरभऱ्याच्या पाल्यासंदर्भातल्या संशोधनाबद्दलची माहिती प्रसिद्ध झाली आहे. त्या संशोधनानुसार, पौष्टिक तत्त्वांच्या बाबतीत हरभऱ्याचा पाला हा पालक, मोहरी, मेथी यांच्या तुलनेत अधिक समृद्ध आहे. तसंच, तो अधिक स्वादिष्टही आहे. त्या संशोधनात असंही म्हटलं आहे, की गरिबी आणि कुपोषणग्रस्त भागांमध्ये हरभऱ्याच्या पाल्याचं सेवन केलं गेलं, तर कुपोषणाची समस्या दूर होऊ शकते, एवढी क्षमता त्यात आहे.
advertisement
डायबेटीस नियंत्रण : हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीत इन्सुलिनची निर्मिती वाढवण्याची नैसर्गिक क्षमता असते. म्हणूनच चने का साग ही भाजी डायबेटीसग्रस्तांसाठी वरदान आहे. ज्यांना डायबेटीस नाही, त्यांनी ही भाजी सेवन केल्यास डायबेटीस होण्याची शक्यता कमी होऊ शकते.
हृदयविकारापासून संरक्षण : हरभऱ्याच्या पाल्याच्या भाजीत अनेक प्रकारचे हेल्दी फॅट्स आणि पोटॅशियम असतं. ते हृदयाच्या संरक्षणासाठी आवश्यक घटक असतात. हृदयाचे स्नायू लवचीक बनवून त्यांना मजबूत करण्याचं काम हे घटक करतात. त्यामुळे हृदयाची ताण सहन करण्याची शक्ती वाढू शकते.
advertisement
बीपी नियंत्रण : चने का साग ही भाजी सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. रक्तप्रवाह सुधारतो. तसंच, रक्तवाहिन्यांना सुरळीत करण्याचं कामही त्यामुळे होतं. त्यामुळे शरीरात सर्वत्र रक्ताभिसरण चांगलं होतं.
पचन : हरभऱ्याच्या पालेभाजीत खूप फायबर्स असतात. त्यामुळे आतड्यात चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. त्यामुळे आतड्यांचं अस्तर मजबूत होतं. पोटाशी संबंधित समस्यांचं निराकरण होतं.
advertisement
त्वचा : त्वचेवरून फ्री रॅडिकल्स हटवण्यासाठी हरभऱ्याच्या पाल्याची भाजी मदत करते. त्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस कमी होतो. त्यामुळे त्वचेचं सौंदर्य वाढतं. त्यातले अँटीऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन के हे घटक त्वचेचं सौंदर्य वाढवतात.
डोळे : थंडीत हवेचं प्रदूषण जास्त असतं. त्या काळात डोळ्यांच्या संरक्षणासाठी चने का साग ही भाजी उपयुक्त ठरते. त्यातलं व्हिटॅमिन ई आणि के हे घटक डोळ्यांच्या स्नायूंचं पोषण करतात. त्यामुळे डोळ्यांचं तेज वाढतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 08, 2023 6:01 PM IST









