advertisement

फक्त 2 ट्रिक्सने एका मिनिटात पळतील घरातील कॉकरोच; एकदा ट्राय कराच

Last Updated:

How to Get Rid of Cockroaches:किचनमध्ये बरेचदा झुरळं होतात. अनेकदा तर हे किचनमधील भांड्यांना चिटकलेले दिसतात. हे लवकर पळवले नाही तर मोठे आजार उद्भवू शकतात. आम्ही तुमच्यासाठी अशा काही सोप्या ट्रिक्स घेऊन आलो आहोत. ज्यामुळे कॉकरोज काही मिनिटांमध्ये दूर होऊ शकतील.

या ट्रिकने दूर करा कॉकरोच
या ट्रिकने दूर करा कॉकरोच
मुंबई : घरात झुरळं झाल्याने प्रत्येकजण हा त्रस्त असतो. कधी किचनमध्ये तर कधी बेडरुम आणि बाथरुममध्ये छोटे-मोठे कॉकरोज फिरताना दिसतात. काही लोक कॉकरोज पाहताच त्यांना चप्पल, झाडूने मारण्याचा प्रयत्न करतात. मात्र ते एवढ्या वेगाने पळतात की, लगेच कुठेतरी जाऊन लपतात. कॉकोरोच एवढ्या झपाट्याने वाढतात की, ते एक एक मारत बसणं शक्य नसतं. अशा वेळी जेवणाचं साहित्य, भांडे, किचनच्या ड्रॉरमध्ये ठेवलेल्या साहित्यात ते जातात आणि वस्तूंना इंफेक्टेड करतात. स्वच्छतेकडे लक्ष दिले नाही आणि या कॉकरोचला संपवण्यासाठी काही उपाय केला नाही तर तुम्ही आणि तुमची मुलं आजारी पडू शकतात.
घरातून कॉकरोच पळवण्याचे उपाय
घरातून कॉकरोचचा सफाया करायचा असेल तर टेन्शन घेण्याची गरज नाही. तुम्ही मार्केटमध्ये मिळणारे कॉकरोज पळवणारे केमिकल्स वापरुन पाहिले असतील. पण तरीही कॉकरोच पाठ सोडत नसतील. तर हे घरगुती उपाय तुमच्यासाठी बेस्ट आहेत. केमिकल्स युक्त प्रोडक्ट्सने तुम्हाला नुकसानही होऊ शकते. मास्टर शेफ पंकज भदौरिया यांनी एक खूप सोपा उपाय सांगितला आहे. हा तुम्ही अवश्य ट्राय करुन पाहायला हवा.
advertisement
कॉकरोज किचनमध्ये झाले तर हे अनहायजिनिक असतात. सोबतच रोगही पसरवतात. अशा वेळी काही सोपे उपाय तुम्ही करुन पाहणं खूप गरजेचं आहे.
1. कॉकरोज पळवण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे बोरिक पावडर. हे तेच पावडर आहे, जे आपण कॅरमबोर्ड खेळताना बोर्डवर वापरत असतो. तुम्हाला बोरिक पावडर आणि साखर समान प्रमाणात म्हणजेच 1-1 चमचा घेऊन चांगल्या प्रकारे मिक्स करुन घ्यायची आहे. आता ती ज्या ठिकाणी कॉकरोज दिसतात त्या ठिकाणी टाका. ही बोरिक पावडर खाताच कॉकरोचचा खेळ खल्लास होईल. हा उपाय तुम्ही एकदा अवश्य करुन बघा.
advertisement
2. कॉकरोज पळवण्याचा दुसरा सर्वात प्रभावशाली उपाय म्हणजे बेकिंग सोडा हा आहे. यामध्ये समान प्रमाणात साखर मिसळा. तुम्ही 1-1 चमचा हे दोन्ही बाउलमध्ये टाकून मिक्स करुन शकता. घरातील कोपऱ्यांमध्ये हे मिश्रण टाका. हे खाताच कॉकरोज असे पळतील की पुन्हा तुमच्या घरात येणार नाहीत.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
फक्त 2 ट्रिक्सने एका मिनिटात पळतील घरातील कॉकरोच; एकदा ट्राय कराच
Next Article
Yuvraj Singh : खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
खरा व्हिलन धोनी नव्हेच, त्या दोघांनी युवराज करिअर उद्ध्वस्त केलं, एक नाव वाचून पायाखालची जमीन सरकेल
  • युवराज करिअर कुणामुळे संपलं?

  • धोनी नव्हे तर या दोघांची नावे घेतली

  • धोनीने कठीण काळात युवराजला आधार दिला

View All
advertisement