advertisement

Spicy Curry Recipe : अस्सल गावरान रेसिपी, झटपट बनवा झणझणीत डुबुक वडे! भाजीच्या चवीपुढे मटण-चिकनही विसराल

Last Updated:

Traditional Spicy Dubuk Wade Recipe : आपल्याकडे मटण चिकनला टक्कर देणाऱ्या खूप कमी व्हेज रेसिपीज आहेत. आजची ही रेसिपी त्यांपैकीच एक आहे. आज आपण पाहणार आहोत डुबुक वाड्याची भाजी कशी बनवायची.

डुबूक वडे गावठी रेसिपी..
डुबूक वडे गावठी रेसिपी..
मुंबई : बऱ्याच लोकांना मटण चिकन इतकं आवडतं की त्यांना त्यापुढे सर्वकाही फिकं वाटतं. व्हेजिटेरियन पदार्थांना ताशा चवीत आणणं खरंच अवघड आहे. मात्र आपल्याकफडे पारंपरिक असे काई पदार्थ आहेत, ज्यांची चव तुम्हाला चिकन मटण विसरायला भाग पडेल. होय, खरंच.. आज आम्ही तुम्हाला अशाच एका भन्नाट रेसिपीची माहिती देत आहोत.
आपल्याकडे मटण चिकनला टक्कर देणाऱ्या खूप कमी व्हेज रेसिपीज आहेत. आजची ही रेसिपी त्यांपैकीच एक आहे. आज आपण पाहणार आहोत डुबुक वाड्याची भाजी कशी बनवायची. या रेसिपीचा व्हिडीओ इन्स्ट्राग्रामवर chinus.kitchen_ या अकाऊंटवर शेअर केला गेला आहे. चाल तर मग पाहूया अस्सल गावरान डुबुक वडे रेसिपी.
वड्यासाठी लागणारे साहित्य
- बेसन 1 कप
advertisement
- हळद 1/4 टेबलस्पून
- लाल तिखट 1/2 टेबलस्पून
- मीठ चवीनुसार
- कांदा लसूण मसाला 1 टेबलस्पून
- पाणी आवश्यकतेनुसार
वाटणासाठी लागणारे साहित्य
- तेल 3 टेबलस्पून
- काळी मिरी 3
- लवंगा 3
- धणे 1 टेबलस्पून
- चना डाळ 1 टेबलस्पून
- आलं 1 इंच
- लसूण 6 ते 8 पाकळ्या
advertisement
- सुकं खोबरं 1/4 कप
- कोथिंबीर एक मूठ
- कांदा 1
- मीठ चवीनुसार
डुबूक वडे बनवण्याची कृती
- सर्वात आधी डुबुक वडे बनवण्यासाठी बेसन पीठ घ्या. त्यामध्ये हळद, लाल तिखट, मीठ कांडा लसूण मसाला घाला. नंतर त्यामध्ये पाणी घालून बॅटर बनवून घ्या. हे बॅटर फार पातळी नको आणि फार घट्टही.
advertisement
- आता मसाला बनवण्यासाठी गॅसवर एक तवा ठेवा. त्यामध्ये तेल, काळी मिरी, लवंग, धने छान डाळ, आलं, लसूण, कोथिंबीर, कांदा, मीठ आणि सुकं खोबरं घालून छान भाजून घ्या.
- भाजून थंड झाल्यावर यामध्ये थोडा गरम मसाला आणि पाणी घालून हे मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या.
- आता एका कलढाईमध्ये तेल टाका. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये हळद आणि कांदा लसूण मसाला घाला.
advertisement
- लगेच यामध्ये वाटलेला मसालाही घाला आणि छान परतून घ्या.
- मसाल्याला तेल सुटल्यावर त्यामध्ये गरम पाणी घाला आणि उकळी येऊ द्या.
- आता याला उकळी आली की, जे बेसनाचं पीठ आपण भिजवलेलं होतं, ते या रस्स्यामध्ये गोल भज्यांप्रमाणे थोडं थोडं सोडा.
- त्यानंतर भाजीमध्ये बारीक चिरलेली भरपूर कोथिंबीर घाला.
advertisement
- थोड्याच वेळात हे गोळे रश्यासोबत शिजतील आणि तुमची भाजी तयार होईल.
advertisement
या भाजीला खूप छान सुगंध आणि रंग येतो. तसेच या भाजीची चवदेखील अप्रतिम असते. तुम्ही एकदा ही घरी नक्की बनवून पाहा. घरात कोणतीही भाजी नसेल तेव्हा ही भाजी बनवा. सगळे आनंदाने खातील.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Spicy Curry Recipe : अस्सल गावरान रेसिपी, झटपट बनवा झणझणीत डुबुक वडे! भाजीच्या चवीपुढे मटण-चिकनही विसराल
Next Article
advertisement
बांगलादेशींचे मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क, मोठा कट उघड
मुंबई पोलिसांना 'ओपन चॅलेंज'; बॉर्डरवर लाच दिली अन् शहरत उभे केले नेटवर्क
  • ही मुंबईची सुरक्षा की थट्टा?

  • सीमेवरून सरळ शहरात शिरकाव

  • 'रिव्हर्स एन्ट्री'ने मुंबईच्या सुरक्षेला सुरूंग

View All
advertisement