रेल्वेत प्रवास करताना चुकूनही या वस्तू सोबत ठेवू नका, अन्यथा होईल तुरुंगवास

Last Updated:

प्रवास करताना ज्वलनशील पदार्थांसह प्रवास न करणे फार महत्वाचे आहे.

रेल्वे स्टेशन
रेल्वे स्टेशन
कृष्णा कुमार गौड, प्रतिनिधी
जोधपुर, 21 नोव्हेंबर : सध्या सण उत्सवाचे दिवस आहेत. त्यामुळे रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. अशा परिस्थतीत सुरक्षा व्यवस्थाही अलर्टमोडवर आहेत. राजस्थानच्या जोधपुर मंडळाचे डीआरएम पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, रेल्वे गाड्यांमधील प्रवासी सुविधांसोबतच, रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेबाबतही सतर्कता बाळगली आहे. त्यासाठी विभागावर अतिरिक्त दक्षता घेण्यात येत आहे.
डीआरएम पंकज कुमार सिंह यांनी ट्रेनमध्ये काम करणारे तिकीट तपासणी कर्मचारी, स्थानकांवर पार्सल हाऊसमधील पर्यवेक्षक, भाडेपट्टेधारक, पार्सल पोर्टर्स आणि ट्रेनच्या पॅंट्री कारमध्ये काम करणारे कर्मचारी यांना ज्वलनशील आणि स्फोटक पदार्थांपासून सावधगिरीने काम करण्यास सांगितले आहे. यासोबतच रेल्वे सुरक्षा दल प्रवाशांच्या सुरक्षेवरही लक्ष ठेवून आहे.
advertisement
तसेच स्थानक आणि गाड्यांमध्ये अग्निशामक यंत्रणा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
डीआरएम पंकज कुमार सिंह यांनी सांगितले की, प्रवासी आणि रेल्वे सुरक्षेच्या संदर्भात विभागातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आले आहे. प्रवाशांना ज्वलनशील पदार्थांसह प्रवास न करण्याबाबत जनजागृती करण्यात येत आहे. जोधपूर विभागात 16 ते 22 नोव्हेंबर या कालावधीत विशेष सुरक्षा सप्ताह साजरा केला जात आहे. त्याअंतर्गत सर्व यंत्रणांना अतिरिक्त दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
advertisement
रेल्वेत चुकूनही या वस्तू घेऊन जाऊ नका -
प्रवास करताना ज्वलनशील पदार्थांसह प्रवास न करणे फार महत्वाचे आहे. यामुळे आग आणि अपघात होऊ शकतात आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते. प्रवाशांनी असे ज्वलनशील पदार्थ घेऊन प्रवास करणार नाही, याची काळजी घ्यावी, यावर डीआरएम यांनी विशेष भर दिला आहे. उल्लंघन केल्यास दंड आकारला जाऊ शकतो आणि कारावासाचीही शिक्षा सुनावली जाऊ शकते.
view comments
मराठी बातम्या/Travel/
रेल्वेत प्रवास करताना चुकूनही या वस्तू सोबत ठेवू नका, अन्यथा होईल तुरुंगवास
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement