Paytm Offer for Train Ticket: दिवाळीत घरी जायचंय, पण कन्फर्म तिकीटाचं टेंशन? Paytm ने आणलाय रामबाण उपाय, नवीन फीचर सादर
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Paytm Offer for Train Ticket: पेटीएम अॅप दिवाळीत कन्फर्म ट्रेन तिकीट बुक करण्यासाठी गॅरंटीड सीट असिस्टंट फीचर सादर करत आहे. हे फीचर कसं काम करतं? याचा वापर कसा करायचा? याबद्दल अधिक जाणून घेऊ.
मुंबई, 1 नोव्हेंबर : दिवाळी तोंडावर आली असून लोकांना घरी जाण्याचे वेध लागले आहेत. या काळात ट्रेन, बस आणि फ्लाइटमध्ये फुल्ल गर्दी पाहायला मिळते. अशा परिस्थितीत कन्फर्म ट्रेन तिकिट मिळवण्यासाठी सर्वजण आटापिटा करत असतात. तुमचीही अशीच अवस्था अशेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी घेऊन आलो आहोत. पेटीएम अॅपद्वारे दिवाळीत कन्फर्म तिकीट बुक करता येणार आहे. वास्तविक, पेटीएमने दावा केला आहे की त्यांनी गॅरंटीड सीट असिस्टंट फीचर सादर केले आहे, जे दिवाळीत रेल्वे, बस किंवा फ्लाइटने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कन्फर्म तिकीट बुक करण्यात मदत करेल.
कन्फर्म तिकीट मिळणार?
पेटीएमचं नवीन फीचर तुम्हाला कोणत्या ट्रेनचे कन्फर्म तिकीट आहे याची माहिती देईल. जर ट्रेनमध्ये कन्फर्म तिकीट नसेल, तर तुम्हाला इतर पर्यायांप्रमाणे बस आणि फ्लाइट तिकिटाचे पर्याय दाखवले जातील. मात्र, त्यासाठी एक गोष्ट करावी लागणार आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमचे ट्रेनचे तिकीट बुकिंग अपडेट करावे लागेल.
advertisement
या स्टेप फोलो करा
पहिल्यांदा तुम्हाला पेटीएम अॅपच्या रेल्वे तिकीट बुकिंग विभागात जावे लागेल.
यानंतर डेस्टिनेशन लोकेशन भरावे लागेल.
जर कन्फर्म तिकिटे उपलब्ध नसतील, तर पेटीएम अॅप तुम्हाला जवळपासच्या स्टेशन्सवरील कन्फर्म तिकिटांसाठी पर्याय दाखवेल.
अशा परिस्थितीत बोर्डिंग स्टेशन बदलून कन्फर्म तिकीट मिळू शकते.
advertisement
तिकीट बुकिंगवर तुम्हाला सूट
पेटीएम ट्रॅव्हल कॉर्नवॉल सेलची तिकीट बुकिंग सुविधा 27 ऑक्टोबर ते 5 नोव्हेंबरपर्यंत सुरू राहील. या कालावधीत फ्लाइट तिकिटांवर 15 टक्क्यांपर्यंत सूट मिळू शकते. तसेच, फ्लाइट रद्द केल्यावर 100 टक्के परतावा दिला जाईल. याशिवाय ट्रेन आणि बस तिकिटांवर 20 टक्के झटपट सूट मिळू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 01, 2023 6:34 PM IST
मराठी बातम्या/Travel/
Paytm Offer for Train Ticket: दिवाळीत घरी जायचंय, पण कन्फर्म तिकीटाचं टेंशन? Paytm ने आणलाय रामबाण उपाय, नवीन फीचर सादर