6-7 Dating Trend : काय आहे '6-7 डेटिंग' ट्रेंड? नात्यातील संघर्ष आणि तणाव करण्यासाठी Gen Z ने शोधला नवा मार्ग!
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
What Is Gen Z's 6-7 Dating Trend : एकीकडे बूमर्सच्या अपेक्षा सांभाळायच्या आणि दुसरीकडे नव्या पिढीशी जुळवून घ्यायचं आव्हान मिलेनियल्ससमोर आहे. मात्र Gen Z म्हणजेच 2000 नंतर जन्मलेली लोक आणि आजची तरुण पिढी शांतपणे आणि समजूतदारपणे या सगळ्याला समोरे जाताना दिसत आहेत.
मुंबई : मिलेनियल्स म्हणजेच 90 च्या दशकात जन्मलेली लोक अजूनही डेटिंगच्या जगात झगडताना दिसत आहेत. एकीकडे बूमर्सच्या अपेक्षा सांभाळायच्या आणि दुसरीकडे नव्या पिढीशी जुळवून घ्यायचं आव्हान मिलेनियल्ससमोर आहे. मात्र Gen Z म्हणजेच 2000 नंतर जन्मलेली लोक आणि आजची तरुण पिढी शांतपणे आणि समजूतदारपणे या सगळ्याला समोरे जाताना दिसत आहेत. जेन झींचा डेटिंगशी संबंधित प्रत्येक नवा शब्द लक्षात ठेवणं अवघड असलं, तरी प्रत्येक नव्या ट्रेंडसोबत ही पिढी नातेसंबंधांतील भावना बाजूला ठेवून वास्तव स्वीकारत आहेत.
सिंगल्स असलेल्या जेन झींमध्ये सध्या ‘6-7 डेटिंग’ हा नवा ट्रेंड चर्चेत आहे. हा ट्रेंड सो कॉल्ड काल्पनिक प्रेमकथांच्या अपेक्षा बाजूला ठेवून वास्तव स्वीकारायला सांगतो. तसेच ज्या व्यक्तीसोबत सुरक्षितता, मानसिक शांतता आणि स्थैर्य जाणवतं अशा व्यक्ती काही दुर्लक्ष करण्यासारख्या कमतरता असल्या तरी त्याची जोडीदार म्हणून निवड करण्यास मदत करतो.
6-7 डेटिंग म्हणजे नेमकं काय?
सायकोलॉजी टुडेच्या रिपोर्टनुसार, ‘6-7 डेटिंग’ ट्रेन्डचा नेमका उगम सांगता येणार नाही, परंतु नातं निवडण्यास मदत करणारा हा सध्या हा ट्रेन्ड प्रचंड लोकप्रिय झाला आहे. खरं तर ‘6-7 डेटिंग’ मध्ये एखादी व्यक्ती कशी असावी याचं स्पष्ट असं उत्तर नाही. परंतु त्यातील गृहितकं तुम्हाला कल्पनेतील जोडीदाराऐवजी वास्तव स्वीकारून व्यक्तीची निवड करण्यास मदत करू शकतात. काही लोकांना हा ट्रेन्ड काही प्रमाणात निरर्थकही वाटू शकतो. मात्र या ट्रेन्मध्ये कल्पनेत रमन्यापेक्षा आणि अपेक्षांचं ओझं वाहून नेण्यापेक्षा एकत्र हसणं, समान ध्येय ठरवणं आणि भावनिक जवळीक साधण्याची इच्छा दडलेली आहे.
advertisement
अनेकजण प्रेमकथा वाचतात, रोमँटिंक चित्रपट पाहतात आणि आपल्याही आयुष्यात आपल्याला असाच एखादा देखाणा राजकुमार किंवा सुंदर राजकुमारी मिळावी असे स्वप्नं पाहतात. परंतु वास्तव हे त्याहून खूप वेगळं असतं. आयुष्याचा जोडीदार कुणालाही जंगलात प्राण्यांसोबत खेळताना किंवा नाचगाणी करताना भेटत नाही. वास्तवातील जोडादार, मित्र, प्रियकर-प्रेयसी हे त्यांच्या स्वभावानुसार आणि पसरिसरानुसार वेगळे असतात. त्यामुळे प्रत्येकाला अपेक्षांनुसार 10 पैकी 10 गुण मिळवणारा जोडीदार मिळणे अश्यक्य असते. जे असे माणून पुढे जातात, त्यांच्या आयुष्या नंतर वादविवाद, भांडंण आणि नातं संपण्यापर्यंत गोष्टी जातात. त्यामुळे नवी पिढी ही ‘6-7 डेटिंग’ ट्रेन्डला पसंती देत आहे.
advertisement
10 पैकी 7 अपेक्षा पूर्ण केल्या तरी चालतं?
आपल्या आयुष्यात कोणत्याही व्यक्तीची ओळख किंव भेट ही शाळा, कॉलेज, कॅफे, मित्रमैत्रिणींच्या ओळखीतून किंवा ऑफिसमध्ये होत असते. अनेकदा एखादी व्यक्तीमध्ये काही गोष्टी अपेक्षेनुसार असतात, तर काही अपेक्षांच्या विरुद्ध असताता. त्यामुळे अशा व्यक्ती फक्त ‘10 पैकी 10’ गुण असलेली वाटत नसल्याने नाकारली जाते. इथंच Gen Z चा हा रिलेशनशिप ट्रेंड पुढे येतो आणि सगळं गणित बदलतो. परफेक्ट 10/10 शोधण्याऐवजी आणि ज्याच्यासोबत सिनेमासारखी प्रेमकहाणी रंगवता येईल अशा व्यक्तीऐवजी Gen Z लोक सध्या 10 पैकी 6 गुण मिळवणारे किंवा 10 सात गुण मिळवणाऱ्या व्यक्तीसोबत देखील डेटिंग करण्यास पसंती देत आहेत. कारण ही व्यक्त पूर्णपणे परफेक्ट नसली तरी ती चांगली असू शकते असे मानले जाते.
advertisement
6-7 डेटिंग ट्रेंड का झाला लोकप्रिय?
6-7 स्केलवरील जोडीदार स्थैर्य, भावनिक परिपक्वता, शांतता, आपुलकी, विश्वासार्हता आणि दिलासा देतो. कागदावर परफेक्ट वाटणाऱ्या पण प्रत्यक्षात मानसिक थकवा देणाऱ्या 10 च्या मागे धावण्यापेक्षा हा पर्याय अधिक चांगला मानला जातो. सतत डेटिंग बर्नआउटशी लढण्यापेक्षा आरामदायी आणि शांत आयुष्य जगणं केव्हाही चांगलं मानले जाऊ लागले आहे.
advertisement
कुणीही खरंच 10/10 नसतो...
प्रामाणिकपणे सांगायचं तर, कुणीही खरंच 10/10 नसतो. पहिल्या नजरेत एखादी व्यक्ती परफेक्ट वाटू शकते, पण ओळख वाढल्यानंतर तिच्या सवयी, लकबी समोर येतात आणि तो 10 कधी 9, 8 किंवा 7 होतो हे कळतही नाही. विशेष म्हणजे, 6-7 डेटिंग म्हणजे थेट कमिटमेंट असंच नाही. हा कमिटमेंट आणि कॅज्युअल डेटिंग यामधला सुवर्णमध्य आहे. हा एखाद्या ‘सिच्युएशनशिप’सारखा प्रकार आहे, पण इथे तुम्ही जोडीदारावर विश्वास ठेवू शकता. नात्यातील चढ-उतारांपासून थोडी विश्रांती देणारा आणि मानसिकदृष्ट्या अधिक आरोग्यदायी वाटणारा हा दृष्टिकोन आहे. काहींना हा जुना विचार नव्या शब्दांत मांडल्यासारखा वाटू शकतो. बूमर्सना विचारलं, तर तेही सांगतील की त्यांनी काल्पनिक 10/10 पेक्षा आराम आणि तडजोड निवडली.
advertisement
मात्र अनेकांना हा 6-7 डेटिंग ट्रेंड ‘रेड फ्लॅग’ वाटतो. कारण एखाद्या व्यक्तीला गुण देणं म्हणजे तिला कंट्रोल करण्याचा प्रयत्न असल्याचं मानलं जातं आणि ‘सेटल’ होणं म्हणजे भीती आणि एकटेपणापासून पळ काढणं असं समजलं जातं. तुम्ही या ट्रेंडकडे कसं पाहता, हे पूर्णपणे तुमच्यावर आहे. पण एवढं नक्की मान्य करावं लागेल की, हा दृष्टिकोन तुमच्या डेटिंग अपेक्षांची दिशा बदलू शकतो.
advertisement
अपेक्षांची 10 पैकी 6 किंवा 7 श्रेणी...
खरं तर 6-7 डेटिंग ट्रेंडमध्ये स्पष्ट रेड फ्लॅग्स बाजूला काढल्यानंतर समोरच्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं जातं. जर ती व्यक्ती अपेक्षांच्या 10 पैकी 6 किंवा 7 श्रेणीत बसत असेल म्हणजे ग्रीन, बेज आणि थोडेफार यलो फ्लॅग्स यांचा समतोल असेल, तर तिच्यासोबत डेटिंगचा विचार करता येतो. कोण जाणे, तीच व्यक्ती तुमची सोलमेट ठरू शकते. हे देखील लक्षात घेतले पाहिजे की आपले आई-वडील आणि आजी-आजोबा हे कपल्सही एकमेकांसाठी 10 पैकी 10 नव्हते; पण त्यांनी आपल्या नात्यावर मेहनत घेतली आणि ते आज आपल्याला परफेक्ट वाटतात. त्यामुळे हा ट्रेन्ड आता चर्चेत आला आहे.
Disclaimer : या बातमीत दिलेली माहिती आणि सल्ला तज्ञांशी झालेल्या संभाषणांवर आधारित आहे. ही सामान्य माहिती आहे, वैयक्तिक सल्ला नाही. म्हणून कोणत्याही सल्ल्याचे अनुसरण करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. कोणतेही नुकसान झाल्यास त्यासाठी न्यूज-18 जबाबदार राहणार नाही.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2026 4:03 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
6-7 Dating Trend : काय आहे '6-7 डेटिंग' ट्रेंड? नात्यातील संघर्ष आणि तणाव करण्यासाठी Gen Z ने शोधला नवा मार्ग!









