तुम्ही डासांमुळे त्रस्त आहात? ‘ही’ झाडे घरात लावा आणि दुर पळवा, Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
घरात काही झाडे लावली तर यामुळे घरामध्ये डासांचं प्रमाण कमी होईल किंवा डास नाहीसे होतील.
छत्रपती संभाजीनगर, 24 नोव्हेंबर : सध्या डासांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे. डासांमुळे आपल्याला अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे मानसिक त्रास देखील होतो. पण आपण आपल्या घरात काही झाडे लावली तर यामुळे घरामध्ये डासांचं प्रमाण कमी होईल किंवा डास नाहीसे होतील. तर ही झाडे कोणती आहेत याबद्दलच छत्रपती संभाजीनगर येथील वनस्पती संशोधक हर्षवर्धन कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
कोणती झाडे लावावीत?
वनस्पती शास्त्रनुसार काही अशी झाडे आहेत जे आपण घरात लावल्यामुळे डासांचं प्रमाण कमी होते किंवा डास नाही होत. सर्वप्रथम झाड म्हणजे जे आपल्या सर्वांच्या घरी असतंच हे झाड म्हणजे तुळस. तुळस आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये असते तुळशीला आध्यात्मिक महत्त्व देखील आहे. वनस्पती शास्त्रानुसार जर घरामध्ये तुळस असेल तर यामुळे डास हे घरामध्ये येत नाहीत. तुळशीला ज्या मंजुळा येतात त्यांच्या वासामुळे डास येत नाहीत. त्यामुळे घरामध्ये किंवा घराच्या अवतीभवती तुळशी या मोठ्याप्रमाणात लावाव्यात, असं कर्णिक सांगतात.
advertisement
झेंडू
दसरा, दिवाळी किंवा कोणताही कार्यक्रम असू आपण सर्वजण झेंडूचे फुले आपल्या घरामध्ये वापरत असतो. आपल्या घराच्या अवतीभवती किंवा आपल्या घरामध्ये झेंडूचे झाडे असतील तर यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये डास येत नाहीत. यामागचं कारण असं की हे झाड कीटकनाशक आहे. हे झाड आपल्या अवतीभोवती असेल तर साप देखील सुद्धा येत नाही आणि डास सुद्धा येत नाहीत.
advertisement
पुदिना
आपण आपल्या स्वयंपाक घरामध्ये पुदिन्याचा वापर करतो. पण पुदिन्याचे झाड आपल्या घराच्या अवतीभवती असेल तर यामुळे सुद्धा डास येत नाही. पुदिनाच्या पानाचा वास हा माणसांना खूप आवडतो पण तो वास कीटकांना किंवा डास ना आवडत नाही. यामुळे हे झाड घराभोवती लावलं तर डास आपल्या घरामध्ये येत नाहीत.
advertisement
सिट्रोनिला गवत
सिट्रोनिला गवत आपण आपल्या घराच्या अवतीभवती लावलं तर या झाडाच्या वासाने कोणताच कीटक किंवा कोणताही डास आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीत आणि आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये देखील हा डास येणार नाहीत. ही झाडे जर तुम्ही तुमच्या घराच्या अवतीभवती लावली तर नक्कीच तुम्हाला डासांपासून सुटका मिळेल,असंही कर्णिक सांगतात.
Location :
Chhatrapati Sambhaji Nagar,Maharashtra
First Published :
November 24, 2023 9:12 AM IST