advertisement

चांगल्या घरच्या मुली टपोरी मुलांच्या प्रेमात का पडतात? महिला PSI नं सांगितली या मागची खरी मानसिकता

Last Updated:

यामध्ये मुलीची काय समज असतो? यात काय आणि कुठे चुकतं हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे.

AI Generated photo
AI Generated photo
मुंबई : प्रत्येक आई-वडिलांचं एक स्वप्न असतं की आपल्या मुलीने शिकलं पाहिजे, स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तिला आयुष्याचा एक सुसंस्कृत जोडीदार मिळाला पाहिजे. पण सध्या चित्र काहीसं वेगळं आणि चिंताजनक दिसतंय. चांगल्या घरातल्या, सुशिक्षित मुली अचानक एखाद्या 'छपरी' किंवा गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या मुलाच्या प्रेमात पडतात, तेव्हा समाजाला आणि पालकांना मोठा धक्का बसतो. "अरे, या मुलीला यात काय दिसलं?" हा प्रश्न प्रत्येकाच्या ओठावर असतो. पण कारण मात्र कोणाला कळत नाही, पण अखेर या प्रश्नाचं मर्म आणि त्यामागचं भयानक मानसशास्त्र महाराष्ट्र पोलीस दलातील PSI मोसमी कटरे यांनी अत्यंत परखडपणे उलगडून सांगितलं आहे.
यामध्ये मुलीची काय समज असतो? यात काय आणि कुठे चुकतं हे देखील त्यांनी दाखवून दिलं आहे.
'क्वीन' असल्याचा भास आणि बॉडीगार्डचा गराडा
PSI कटरे यांच्या मते, या आकर्षणामागे एक 'सायकॉलॉजिकल ट्रॅप' आहे. जेव्हा एखादी मुलगी अशा गुंड प्रवृत्तीच्या मुलासोबत असते, तेव्हा त्या मुलाचे 5-6 मित्र तिला 'भाभी' किंवा 'वहिनी' म्हणून बोलतात. तिला इज्जत देतात, काळजी घेतात.
advertisement
"ती मुलगी जेव्हा त्यांच्यामध्ये वावरते, तेव्हा ते मुलं तिला एखाद्या बॉडीगार्डप्रमाणे ट्रीट करतात. 'ही आपल्या भाईची सेटिंग आहे, ही आपली वहिनी आहे' असं म्हणत तिला एक वेगळंच संरक्षण देतात. यामुळे त्या मुलीला आपण कुणीतरी 'क्वीन' (राणी) आहोत आणि हे सगळे माझे रक्षक आहेत, असा आभास निर्माण होतो," असं PSI कटरे सांगतात.
advertisement
कुणी त्या मुलीकडे पाहिलं आणि त्या गुंड मुलाने त्याला मारलं, की त्या मुलीला आपण एखाद्या चित्रपटातली हिरोईन आहोत असं वाटू लागतं. तिला वाटतं की हा मुलगा माझं रक्षण करेल, पण तिला हे उमजत नाही की जो कायद्याचा आदर करत नाही, तो तिचा आदर काय करणार?
advertisement
समाजातील शून्य किंमत आणि भविष्याचा धोका
PSI मोसमी कटरे यांनी मुलींना एक कडक इशारा दिला आहे. त्या म्हणतात, "ज्या मुलांसोबत फिरताना तुम्हाला 'कूल' वाटतंय, त्यांची समाजात काहीच किंमत नसते. लोक त्यांना घाबरत नाहीत, तर त्यांच्या घाणीत कोण पडेल म्हणून दुर्लक्ष करतात. हे तथाकथित 'हिरो' एक दिवस तुम्हाला अशा खाईत लोटतात जिथून बाहेर पडणं अशक्य असतं."
advertisement
गुन्हेगार हे कधीच 'स्टाईल आयकॉन' असू शकत नाहीत. ते समाजासाठी घातक आहेत. खोटा रुबाब आणि तात्पुरतं अटेंशन मिळवण्यासाठी आपलं सोन्यासारखं आयुष्य या 'छपरी' लोकांच्या नादी लागून उद्ध्वस्त करू नका, असा मोलाचा सल्ला ही त्यांनी तरुणींना दिला आहे.
पालकांनो, संवाद साधा
जर तुमच्या घरातील किंवा ओळखीतील कोणी अशा चुकीच्या मार्गाला जात असेल, तर त्यांच्याशी संवाद साधा. 'कूल' दिसणं आणि 'चांगलं' असणं यातील फरक त्यांना समजून सांगा. कारण खरा हिरो तो नसतो जो नियम मोडतो, तर खरा हिरो तो असतो जो संविधानाचा सन्मान करतो आणि महिलांचा आदर राखतो.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
चांगल्या घरच्या मुली टपोरी मुलांच्या प्रेमात का पडतात? महिला PSI नं सांगितली या मागची खरी मानसिकता
Next Article
advertisement
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात; लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली, सरकारचा मोठा निर्णय
8th Pay Commissionचा 'श्रीगणेशा', पगारवाढीचा फॉर्म भरण्यास सुरुवात
  • 8व्या वेतन आयोगाबाबत सरकारचा मोठा निर्णय

  • लाखो कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली!

  • पगार आणि पेन्शन किती वाढणार

View All
advertisement