ख्रिसमससाठी आकर्षक कँडल्स, मिळतायत फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यात इथं करा खरेदी
- Reported by:Bhavna Arvind Kamble
- Published by:Mohan Najan
Last Updated:
विशेष म्हणजे या कँडल्सची किंमत अवघ्या 50 रुपयांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता पाहायला मिळत आहे.
ठाणे : ख्रिसमस सण अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असून सर्वत्र सणाच्या उत्साहाला सुरुवात झाली आहे. घरोघरी सजावट, रोषणाई आणि भेटवस्तूंची खरेदी सुरू असताना बदलापूरमधील 7K कँडल या होम बुटीकने ख्रिसमससाठी खास आणि आकर्षक कँडल्सची मोठी रेंज ग्राहकांसाठी उपलब्ध करून दिली आहे. विशेष म्हणजे या कँडल्सची किंमत अवघ्या 50 रुपयांपासून सुरू होत असल्याने ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्सुकता पाहायला मिळत आहे.
या होम बुटीकमध्ये ख्रिसमसच्या थीमवर आधारित विविध आकार, रंग आणि डिझाइनमधील कँडल्स उपलब्ध आहेत. ख्रिसमस ट्री, बेल, स्टार्स, केक, वाइन ग्लास, फुलं यांसारख्या आकर्षक कँडल्समुळे घराची सजावट अधिक सुंदर आणि सणासुदीची वाटावी यासाठी ग्राहकांचा कल वाढताना दिसत आहे. फुलांच्या आकारातील कँडल्स 50 रुपयांपासून उपलब्ध असून ख्रिसमस ट्री कँडल्स केवळ 100 रुपयांत मिळत आहेत.
advertisement
याशिवाय टेडी कँडल्स 150 ते 250 रुपयांच्या दरात उपलब्ध आहेत. हाऊस शेप कँडल्स, बेल, केक, बेअर अशा विविध ख्रिसमस रिलेटेड कँडल्सही येथे पाहायला मिळतात. विशेष आकर्षण म्हणजे पारंपरिक गोड पदार्थांच्या आकारातील स्वीट्स कँडल्स लाडू, मिठाई, करंजी, मोदक अशा स्वरूपातील कँडल्सही फक्त 50 रुपयांत मिळत आहेत.
advertisement
त्याचबरोबर वेगवेगळ्या सुगंधाचे आणि डिझाइनचे जार कँडल्सही येथे उपलब्ध असून घरातील वातावरण अधिक प्रसन्न करण्यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. ग्राहकांच्या मागणीनुसार कँडल्स कस्टमाईज करून देण्याची सुविधाही 7K कँडलकडून दिली जात असून तीही अतिशय परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहे.
विशेष म्हणजे बदलापूरसह इतर ठिकाणचे ग्राहकही ऑनलाइन ऑर्डरद्वारे या कँडल्सची खरेदी करू शकतात. त्यासाठी 9511661024 या क्रमांकावर संपर्क साधता येईल. ख्रिसमस सणाच्या पार्श्वभूमीवर 7K कँडलमधील ही आकर्षक आणि बजेट-फ्रेंडली कँडल्स ग्राहकांसाठी विशेष आकर्षण ठरत असून सणाचा आनंद द्विगुणित करत आहेत.
view commentsLocation :
Thane,Maharashtra
First Published :
Dec 20, 2025 5:11 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
ख्रिसमससाठी आकर्षक कँडल्स, मिळतायत फक्त 50 रुपयांपासून, ठाण्यात इथं करा खरेदी









