महापालिका निवडणुकीत महायुतीत रंगणार 'दोस्तीत कुस्ती', राज्यात 'या' ठिकाणी येणार आमने-सामने
- Published by:Prachi Amale
Last Updated:
राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांची कशा प्रकारे ताकद आहे हे जाणून घेऊया...
मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत 'जिथं फायद्याचं असेल तिथंच युती करणार', 'तुल्यबळ ठिकाणी युती करणार नाही' असं मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. यामुळं महापालिका निवडणुकीत महायुतीतच दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे. राज्यातील प्रमुख महापालिकांमध्ये महायुतीतल्या पक्षांची कशा प्रकारे ताकद आहे हे जाणून घेऊया...
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागलेत. अशातच प्रत्येक ठिकाणी आतापासूनच प्रत्येक पक्ष आपापल्या ताकदीची चाचपणी करतोय. मुंबई महापालिका वगळचा इतर ठिकाणी महायुतीतचं सामना रंगणार आहे. एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे पालिकेत शिंदेंच्या शिवसेनेसोबत युतीची शक्यात धूसर आहे. तर भाजप पिंपरी चिंचवडमध्ये स्वबळावर निवडणूक लढवणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
advertisement
ठाणे
ठाण्यात 2017 मध्ये एकसंध शिवसेनेची सत्ता आली होती. शिवसेनेचे 67 तर भाजपचे 23 नगसेवक होते...
पण आता चित्र बदललं आहे. शिवसेनेत दुफळीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत सामना रंगणार आहे.
कल्याण- डोंबिवली
गेल्या वेळी कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेना-भाजपची सत्ता होती.शिवसेनेचे 53 तर भाजपचे 43 नगरसेवक निवडून आले होते.
उल्हासनगर
उल्हासनगरात भाजपची सत्ता होती. भाजपचे 32 तर शिवसेनेचे 24 नगरसेवक होते.
advertisement
नवी मुंबई
मुंबईला लागून असलेल्या नवी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता होती.राष्ट्रवादी काँग्रेसचे 52 तर शिवसेनेचे 38 नगरसेवक होते. नवी मुंबईच्या राजकारणात गेल्या काही वर्षात मोठे उलटफेर होत गणेश नाईकांनी भाजपचं कमळ हाती घेतल्यानंतर नवी मुंबईत भाजपचा वरचष्मा निर्माण झालाय.
अंबरनाथ
अंबरनाथ नगरपालिका शिवसेना 22 तर भाजप 10 नगरसेवक होते...बदलापूरमध्ये शिवसेना 22 तर भाजपचे भाजपचे 20 नगरसेवक होते...मीरा भाईंदरमध्ये भाजपची सत्ता होती. इथं भाजपचे 61 तर शिवसेनेचे 22 नगरसेवक होते.
advertisement
नाशिक
नाशिकमध्ये भाजपनं सत्ता भोगली. भाजपचे 66 तर शिवसेनेचे 35 नगरसेवक होते.
छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगरात शिवसेना भाजपची सत्ता होती. शिवसेनेचे 29 तर भाजपचे 22 नगसेवक होते.
पुणे महानगरपालिका
तर पुणे पालिका भाजपच्या ताब्यात होती. इथं भाजपचे 98 नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे 40 नगरसेवक निवडून आले होते.
पिंपरी चिंचवड
advertisement
पिंपरी चिंचवड पालिकेवर भाजपचा कब्जा होता. या पालिकेत भाजपचे 77 नगरसेवक होते तर राष्ट्रवादी काँग्रेसचे त्याखालोखाल 36 नगरसेवक होते. दरम्यान, भाजपने पिंपरी चिंचवड महापालिका स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली असली तर राष्ट्रवादीकडून देखील स्वबळाची चाचपणी करण्यात आल्याचं खुद्द शहराध्यक्ष योगेश बहल यांनी स्पष्ट केलंय
राज्यात महायुतीकडे 232 आमदारांचं बळ आहे.भाजपचे एकट्याचे 132 आमदार आहेत.
advertisement
महायुती सत्तेत असल्यानं कार्यकर्त्यांच्या निवडणुका असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत
उतरावं अशी प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याची इच्छा असते.या सर्व पार्श्वभूमीवर आगामी महापालिका निवडणुकीत महायुतीत दोस्तीत कुस्ती रंगण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
October 23, 2025 9:14 PM IST
मराठी बातम्या/Local Body Elections/
महापालिका निवडणुकीत महायुतीत रंगणार 'दोस्तीत कुस्ती', राज्यात 'या' ठिकाणी येणार आमने-सामने


